Water Conservation: तीव्र उष्णतामानामुळे पश्चिम विदर्भातील जिल्हे विशेषतः अकोला सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहेत. या उष्णतेचा थेट परिणाम जलस्रोतांवर होत असून बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यावर दबाव निर्माण झाला असला तरी पश्चिम विदर्भातील प्रमुख धरणांमध्ये तुलनेने समाधानकारक साठा दिसून येत आहे. .अकोला जिल्ह्यातील वान प्रकल्पात सध्या ४८.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा ४३.११ टक्के होता. काटेपूर्णा प्रकल्पात सध्या २८.४३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत येथे २३.१८ टक्के पाणी होते. यावर्षी साठा तुलनेने अधिक असला तरी दोन्ही प्रकल्प पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सध्या वाढत्या तापमानामुळे सतत बाष्पीभवन होत असून पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सातत्याने पिण्याच्या गरजांसाठी पाण्याचा उपसा सुरू असल्याने साठ्यावर परिणाम जाणवत आहे..Drinking Water Scarcity: ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी धडपड.बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात सध्या ४४.६३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात या प्रकल्पात ५७.११ टक्के साठा होता. पेनटाकळी प्रकल्पात सध्या ४५.१७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तापमानात सतत वाढ होत असल्याने पुढील काही दिवसांत बाष्पीभवनाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट.जलसंपदा विभागाकडून धरणांच्या पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार पाणीवापर नियंत्रणाचे नियोजन करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बाधित होऊ नये यासाठी सर्व प्रकल्पांतील साठ्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे केले जात आहे..सामूहिक प्रयत्नांची आवश्यकतायेत्या काळात पाणीसाठ्याचे संतुलन राखण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.उष्णतेची लाट कायम राहिल्यास विदर्भातील जलस्रोत व्यवस्थापनावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.