डॉ. प्रतीक बनसोडे- इनामदार, डॉ. सचिन वाघमारेLab Technology: माणसांमध्ये रक्त, लघवी, मल तपासण्या केल्या जातात. या तपासणीस अनुसरून डॉक्टर पुढचा अचूक उपचार आपल्या रुग्णांना सांगतात. त्याच प्रमाणे जनावरांमध्ये अशा तपासण्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये केल्या जातात. विविध जनावरांच्या पेशींची संरचना लक्षात घेता अशा प्रयोगशाळांमध्ये विशेषतः जनावरांसाठी तयार केलेली उपकरणे असतात. जेणेकरून आजारांचे अचूक निदान होते..जनावरांमध्ये आरोग्याचे मूल्यांकन करण्याचा आणि संभाव्य आजारांचे निदान करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग रक्त तपासणी आहे.रक्त तपासणीमुळे जनावरांमधील विविध आजार, जसे की संसर्ग, अॅनिमिया, मधुमेह, यकृत, मूत्रपिंडाचे विकार आणि परजीवी संसर्ग यांचे निदान होते.रक्त तपासणीमुळे आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वी त्याची माहिती मिळू शकते. ज्यामुळे वेळीच उपचार करणे शक्य होते. गंभीर परिणाम टाळता येतात..उपचारादरम्यान रक्त तपासणीमुळे औषधांचा परिणाम आणि जनावराच्या शरीराची प्रतिक्रिया यांचे मूल्यांकन करता येते. यामुळे उपचारांचे नियोजन आणि सुधारणा करणे सोपे होते.रक्त तपासणीमुळे जनावरांचे पुनरुत्पादन आरोग्य, पोषणाची कमतरता आणि रोगप्रतिकारक शक्ती यांचे मूल्यांकन करून उत्पादनक्षमता वाढवता येते.रक्त तपासणी ही पशुवैद्यकीय क्षेत्रात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक अचूक आणि विश्वासार्ह साधन आहे. यामुळे जनावरांचे आयुष्य सुधारते उत्पादनक्षमता वाढते. पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळता येते. नियमित तपासणी आणि पशुवैद्यकांच्या सल्ल्याने याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे..Animal Disease Lab : पशुसंवर्धन प्रयोगशाळेबाबत केंद्र-राज्यामध्ये सामंजस्य करार.रक्त तपासणीचे प्रकारपूर्ण रक्त गणना (सीबीसी) : रक्तातील लाल रक्तपेशी (आरबीसी), पांढऱ्या रक्तपेशी (डब्ल्यूबीसी), प्लेटलेट्स आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण तपासले जाते. अॅनिमिया, संसर्ग, रक्तस्राव विकार शोधण्यासाठी तपासणी आवश्यक आहे.रक्त स्मीअर तपासणी : जनावराच्या रक्ताचा नमुना घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. रक्त स्मीअर तयार करून त्याला विशिष्ट रंग (जिम्सा स्टेन) लावला जातो, ज्यामुळे परजीवी (बॅबेसिया किंवा थायलेरिया) दिसू शकतात. बॅबेसियोसिस हा गोचीडद्वारे पसरणारा परजीवीजन्य आजार आहे. आजार गाई, म्हशी आणि घोड्यांमध्ये तसेच कुत्र्यांमध्ये आढळतो..रक्त बायोकेमिस्ट्री चाचणी : रक्तातील रासायनिक घटक जसे, की ग्लुकोज, प्रथिने, यकृत एन्झाइम्स(ALT;AST), मूत्रपिंड कार्य (क्रिएटिनिन, बीयूएन ); इलेक्ट्रोलाइट्स (सोडिअम, पोटॅशिअम) इत्यादी तपासले जातात. यामुळे यकृत, मूत्रपिंड, मधुमेह, पोषण कमतरता, गाई- म्हशींमध्ये कॅल्शिअम कमतरता यांचे मूल्यांकन करता येते.हार्मोन तपासणी : थायरॉइड, ॲड्रिनलिन, पुनरुत्पादन हार्मोन इत्यादी तपासण्यांमुळे प्रजनन समस्यांचे निदान, थायरॉईड विकार, तणावाशी संबंधित आजार यांचे मूल्यांकन होते. जसे की श्वानांमध्ये हायपोथायरॉईडीझम किंवा गाईंमध्ये प्रजनन हार्मोन्सचे मूल्यांकन करता येते..संसर्गजन्य रोग चाचणी : विषाणूजन्य संसर्ग शोधण्यासाठी अँटीबॉडी किंवा अँटीजेन्स तपासले जातात. यामुळे गाईंमध्ये ब्रुसेलोसिस, श्वानांमध्ये डिस्टेंपर, रेबीज इत्यादी रोगांचे निदान होते.लिपिड प्रोफाइल : कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसरॉइडचे स्तर तपासले जातात. यामुळे हृदयरोग, चयापचयाशी संबंधित समस्यांचे मूल्यांकन होते. लठ्ठपणा किंवा यकृताच्या समस्यांचे निदान होते.इलेक्ट्रोलाइट्स तपासणी : सोडिअम, पोटॅशिअम, क्लोराइड, कॅल्शिअम, फॉस्फरस यासारख्या तपासणीमुळे डीहायड्रेशन, मूत्रपिंड विकार हृदयाच्या समस्या, गाईंमध्ये दुग्धज्वर मूल्यांकन केले जाते..Soil Testing : गावातच होणार शेताच्या मातीची परीक्षा.निष्कर्षरक्त तपासणीचे प्रकार जनावरांच्या प्रजाती, वय, लक्षणे आणि संभाव्य आजारांवर अवलंबून असतात. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने योग्य चाचणी निवडणे आणि नियमित तपासणी करणे जनावरांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. यामुळे वेळेवर रोगनिदान आणि उपचार शक्य होतात, ज्यामुळे जनावरांचे आयुष्य आणि दूध उत्पादन क्षमता सुधारते.मल तपासणीपरजीवी तपासणी, जसे की जंत (गोल कृमी, चपट्या कृमी), प्रोटोझुआ (कोक्सिडिया), पचनसंस्था विश्लेषण या तपासण्यांमुळे गाय, म्हैस, श्वान, कोंबड्यांच्यामधील जंत, आतड्यांचे संसर्ग आणि आतड्यांच्या समस्यांचे निदान केले जाते..मूत्र तपासणीया चाचणीमध्ये मूत्रातील प्रथिने, ग्लुकोज, क्रिस्टल्स तसेच संसर्गजन्य जिवाणू तपासले जातात. याचा उपयोग मूत्रपिंड विकार, मधुमेह, मूत्रमार्ग संसर्ग यांचे निदान करण्याकरिता होतो. जसे की श्वान, मांजरांमध्ये मूत्रपिंड आजार किंवा गाईंमध्ये केटोसिस तपासणी.सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणीरक्त, मूत्र, दूध किंवा ऊतकांमधील जिवाणूंची ओळख आणि त्यांच्यावरील अँटिबायोटिक्सची संवेदनशीलता तपासली जाते. गाईंमध्ये कासदाह तपासणी, दूध नमुना चाचणी केली जाते. यामुळे आजाराचे अचूक निदान आणि त्यावरील अचूक अँटिबायोटिकची निवड याकरिता सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणी अत्यंत उपयोगी ठरते..विषाणू तपासणीपीसीआर, ईएलआयएसए पद्धतीद्वारे विषाणूंची ओळख केली जाते. एफएमडी विषाणू, रेबीज विषाणू, लंपी चर्मरोग विषाणू इत्यादींचे निदान केले जाते.पोस्टमॉर्टम नमुने तपासणीमृत जनावरांच्या ऊतकांचे नमुने तपासून मृत्यूचे कारण शोधले जाते. संसर्गजन्य आजार, विषबाधा किंवा इतर आजारांच्या निदानासाठी केला जातो. जसे, की पोल्ट्रीमध्ये न्यूकॅसल आजार किंवा गाईंमध्ये अँथ्रॅक्स तपासणी..पोषण ,चयापचय तपासणीरक्तातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि चयापचयाशी संबंधित घटक तपासले जातात. त्यामुळे पोषण कमतरता किंवा चयापचय विकार, केटोसिस किंवा दुग्धज्वराचे निदान होते.-डॉ. प्रतीक बनसोडे- इनामदार ८७००६२४९७९-डॉ. सचिन वाघमारे ८९७५६३६८८१(लेखक पशुआजार तज्ज्ञ आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.