Solapur News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी पार पडली. त्यात २१ वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला व एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी महिला आहेत. पडताळणीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. ज्या सुना किंवा मुलीचे रेशनकार्ड विभक्त आहे, त्यांचा बंद केलेला लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे..लाडकी बहीण योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील महिला पात्र होत्या. तसेच एका कुटुंबातील एक विवाहित, एक अविवाहित अशा दोनच महिला पात्र ठरत होत्या. तरीदेखील, निकष डावलून लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आणि लाभही मिळविला..Ladki Bahin : ‘लाडकी बहीण’मुळे वित्तीय तूट नाही .माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील माहितीवरून असे लाभार्थी बाजूला काढून त्यांची पडताळणी करण्यात आली. पण, सोलापूर जिल्ह्यातील साडेदहा हजार तर राज्यभरातील चार लाखांहून अधिक महिला त्यांनी अर्ज भरताना दिलेल्या पत्त्यावर सापडल्याच नाहीत. .दुसरीकडे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले असले, तरी अनेक मुलींचा विवाह झाल्याने त्यांचे रेशनकार्ड विभक्त आहे. त्यामुळे अशा सुना मुलींचा लाभ बंद होणार नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले..Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता थांबला; मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन.‘आधार’ नंबर चुकला; लाभ दुसऱ्याच्या खात्यातलाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरताना शेकडो महिलांकडून आधारकार्डवरील क्रमांक चुकीचा टाकला गेला आहे. शासन स्तरावरून त्या महिलांना लाभ वितरित होतोय, पण आम्हाला आतापर्यंत लाभ मिळालाच नाही, अशा तक्रारी अनेक महिलांनी ‘लाडकी बहीण’च्या पोर्टलवर केल्या आहेत. त्या तक्रारींची पडताळणी अधिकाऱ्यांनी केली, त्यावेळी आधार क्रमांक चुकल्याने आतापर्यंत दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात लाभ जमा झाल्याची बाब समोर आली आहे..योजनेच्या पडताळणीची स्थितीअपेक्षित पडताळणी १.०४ लाखकुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी ८३,७२२पत्त्यावर न सापडलेल्या महिला १०,०००पडताळणी झालेल्या महिला ९४,०००.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सोलापूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार लाभार्थी महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली. त्यात सुमारे दहा हजार महिला त्यांच्या राहत्या पत्त्यावर सापडल्या नाहीत. पडताळणीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. शासन स्तरावरून त्यांच्या संदर्भातात निर्णय होईल.- रमेश काटकर, महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.