Beed News: कुसुम सोलार वॉटर पंप योजनेअंतर्गत ७.५ एचपी सोलार वॉटर पंपासाठी केलेल्या अर्जातील शेतकऱ्याने दिलेला नंबर बदलला गेला. सोबतच वेंडरही निवडला गेल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. हे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने हे झाले कसे या विषयी ‘मेडा’कडे विचारणा केली आहे..या संदर्भात ‘मेडा’ला विचारणा करणारे शेतकरी हे गोविंद बापूसाहेब गित्ते (तळणी, ता. अंबाजोगाई) येथील रहिवासी आहेत. श्री. गित्ते यांच्या माहितीनुसार, त्यांनी कुसुम सोलार वॉटर पंप योजनेअंतर्गत ७.५ एचपी सोलार वॉटर पंपासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज क्रमांक MK२३१११३८२५७४ आणि अर्जानुसार लाभार्थी नाव गोविंद बापूसाहेब गिते आहे. .Solar Pump Scheme: माजलगावात अल्पभूधारकांना मिळेना सौर कृषिपंप योजना.केलेल्या अर्जामध्ये त्यांनी मोबाइल नंबर ८३८०९४५७५७ असा जोडला होता. योजनेअंतर्गत निवड झाल्याने त्यांनी Meda Beneficiary App ॲप डाउनलोड करून मोबाइल नंबर प्रविष्ट करून त्यांच्या शेतातून सेल्फ सर्व्हे केला. १ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकरी हिस्सा म्हणून ३९ हजार रुपयांचा ऑनलाइन भरणा केला. शेतकरी हिस्सा रक्कम भरल्यानंतर चांगल्या, योग्य सेवा देणाऱ्या नामांकित कंपन्यांचा समावेश वेंडर लिस्टमध्ये केलेला नव्हता त्यामुळे त्यांनी वेंडर निवड केली नाही. .Solar Pump Scheme: सौर कृषिपंप शेतकऱ्यांसाठी ठरताहेत वरदान.काही दिवस थांबून योग्य सेवा देणारी कंपनी वेंडर लिस्टमध्ये आल्यानंतर वेंडर निवडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनतर त्यांनी दोन वेळा मोबाइल नंबरवरून मेडा बेनिफिशरी ॲपमधून (Meda Beneficiary App) लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला. मात्र अलीकडे मोबाइल नंबर टाकला असता मोबाइल नंबरमधून लॉग इन झाले नाही. शेवटी श्री. गित्ते यांनी मेडा वेबसाइटवरून अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन केले. तेव्हा त्यांना त्यांचा मोबाइल नंबर बदललेला आणि वेंडरही निवडल्याचे लक्षात आले..कारवाईची मागणीआपण आपला मोबाइल नंबर ही बदललेला नाही आणि वेंडरही निवडला नसताना हे झाले कसे या विवंचनेत आपण पडल्याचे श्री. गित्ते म्हणाले. कोणीतरी अज्ञात इसमाने मोबाइल नंबर बदलून जाणीवपूर्वक वेंडर म्हणून एक कंपनी निवडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आपली फसवणूक करण्यात आली असल्याने या बाबत योग्य ती कारवाई करण्याची विनंतीही श्री. गित्ते यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.