Pune News: छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्यात आले आहे. राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. यामुळे वेल्हे तालुका आता राजगड नावाने ओळखला जाणार आहे. महाराष्ट्र सरकार यासंदर्भात राजपत्र जारी करणार आहे..छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे तालुक्यासंदर्भात शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासीयांची ही मागणी होती. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात राजगड आणि तोरणा यांसारखे ऐतिहासिक किल्ले आहेत..CM Devendra Fadnavis: तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा: मुख्यमंत्री.वेल्हे तालुक्यातील राजगडाला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. कारण याच राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे स्वराज्याचा कारभार केला. याच किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे गाव वसले आहे. यामुळे राजगड किल्ल्याचे नाव तालुक्याला देण्यासंदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही त्याला मंजुरी दिली आहे..Maharashtra Cabinet Decision : आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना मानधन दुप्पट.वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करावे यासाठी ठराव घेण्यात आले होते. यादरम्यान तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडून ५ मे २०२२ ला प्रस्ताव दाखल करून घेण्यात आला होता. .उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. या पत्रातून त्यांनी वेल्हे तालुक्याचे नाव बदलून ‘राजगड’ करण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी केली होती. त्या वेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते..तालुक्याची वैशिष्ट्ये राजगड नावामुळे तालुक्याच्या ऐतिहासिक वारशाला मान्यता मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि विकासाला गती मिळण्याची अपेक्षा.२०११ च्या जनगणनेनुसार, वेल्हे तालुक्याची लोकसंख्या ५४,५१६ आहे, ज्यामध्ये २७५०४ पुरुष आणि २७०१२ महिला आहेत. साक्षरता दर ७५.९६ टक्के आहे, आणि लिंग गुणोत्तर ९८२ (प्रति १००० पुरुषांमागे महिला) आहे.तालुका पूर्णपणे ग्रामीण आहे आणि त्यात १३० गावे आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.