Latur News: कर्नाटकचा सीमाभाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १९) होणाऱ्या वेळा अमावास्या सणासाठी शेतशिवारात मोठा उत्साह आहे. शेतकऱ्यांची लगबग सुरू असून वनभोजनासाठी भाजीपाला खरेदीसह अन्य तयारी सुरू आहे. शहराच्या ठिकाणी वास्तव्यास असलेले शेतकरी कुटुंब गुरुवारी (ता. १८) गावाकडे निघाली असून, यामुळे बाजारात भाजीपाला खरेदीसोबत बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे..दरवर्षी मार्गशीर्ष - पौष महिन्यांतील अमावास्येला ग्रामीण संस्कृतीत कुलदैवत पूजन, निसर्गपूजन व कृषिरक्षण यांचा सुंदर संगम साधला जातो. कलबुर्गी, बीदर, सोलापूर, लातूर, धाराशिव, भालकी, उदगीर, निलंगा, औसा आदी परिसरात अत्यंत श्रद्धेने हा सण साजरा केला जातो..Vel Amavasya : काळ्या आईचं ऋण फेडण्याचा सण 'वेळा अमावस्या'.या सणाच्या नावाचा उगम कर्नाटकात असल्याचे मानले जाते. कन्नड भाषेत याला ‘येळ्ळ अमावास्या’ म्हणतात, त्याचा अर्थ पेरणीनंतर येणारी सातवी अमावास्या असा होतो. या शब्दाचा अपभ्रंश होऊन महाराष्ट्रात ‘येळवस’ किंवा ‘वेळा अमावास्या’ हे शब्द रूढ झाले आहेत..Somvati Amavasya : सोन्याची जेजुरी.. सोमवती अमावस्येनिमित्त भंडारा खोबऱ्याची उधळणी.निसर्गाशी ऋणानुबंध आणि आरोग्यशास्त्राप्रमाणे वेळा अमावास्या हा केवळ धार्मिक विधी नसून, शेतकरी आणि निसर्गाचे अतूट नाते दर्शवितो. भूमातेने दिलेल्या धनधान्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, हा या पूजेचा मुख्य उद्देश असतो. ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होण्याची ही एक विनम्र पद्धत आहे..पूजेसाठी विशिष्ट खाद्यपदार्थदिवसाच्या पूर्वतयारीसाठी पहिल्या दिवशी विविध पारंपरिक पदार्थांची तयारी केली जाते. भजी, आंबिल, रोडगे, (विशिष्ट प्रकारची भाकर), खिचडी, वरण-फळं (पिठापासून उकडलेले पदार्थ), कानवले, खीर, पिठापासून बनवलेले दिवे असे अनेक विशिष्ट पदार्थ तयार करून पूजनासाठी सज्जता केली जाते. या भोजनाची तयारी शेतकऱ्यांनी कुटुंबीयांनी गुरुवारी सकाळपासूनच हाती घेतली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.