Solapur News: काळ्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा वेळा अमावास्या सण शुक्रवारी (ता.१९) सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतातील पिकांमध्ये केली जाणारी पाचपांडवांची प्रतीकात्मक पूजा आणि नातेवाईक, मित्र, आप्तेष्टांसह शेतातील सहभोजनामुळे जिल्ह्यातील शिवारे या उत्सवाने गजबजून गेली. .सोलापूरसह लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वेळा अमावास्येला विशेष महत्त्व आहे. शुक्रवारी (ता.१९) सकाळपासूनच शेतकऱ्यांनी कुटुंबासह शेताची वाट धरली. त्यासोबत नातेवाईक, मित्र आणि आप्तेष्टांचीही मोठी वर्दळ शेतकऱ्यांकडे झाली. या उत्सवात सहभागासाठी शहरातील लोक ग्रामीण भागाकडे येतात, परिणामी शहरातील बाजारपेठा आणि मुख्य रस्ते ओस पडले..दुपारी बाराच्या सुमारास शेतात ज्वारीच्या ताटांपासून बनवलेल्या कोपीत (झोपडीत) प्रतीकात्मक पाच पांडवांची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर खास पुरणपोळी, बाजरीचे उंडे, शेंगापोळ्या, पापड्याकुरड्या, भजी, आंबिल अशा पदार्थांचा नैवेद्य त्यांना दाखविण्यात आला. रब्बी हंगामातील पिकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रतीकात्मक पांडवाकडे देण्यात येते, अशी आख्यायिका या उत्सवामागे आहे..Vela Amavasya: वेळा अमावास्या सणाचा उत्साह.नातेसंबंधांतील जवळीक वाढविणारा उत्सवया सणाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ शेतकरीच नव्हे, तर शहरात राहणारे नोकरदार आणि व्यावसायिकही आपल्या मूळ गावी किंवा मित्रांच्या शेतात एकत्र येतात. शेतकरीही आवर्जून आपले नातेवाईक, मित्र, आप्तेष्टांना आग्रहाने यासाठी बोलावतात, सर्व जण एकत्र बसून शेतात भोजनाचा आस्वाद घेतात, त्यामुळे नातेसंबंधातील जवळीक वाढविणारा हा उत्सव मानला जातो..Festival Preparation: गोंदवले यात्रेसाठी प्रशासनाने सतर्क राहावे.खास पदार्थांची मेजवानीवेळ अमावास्या म्हणजे चवींची मेजवानीच असते. या दिवशी बनवले जाणारे पदार्थ केवळ चविष्ट नसून ते आरोग्यासाठी आणि बदलत्या हवामानासाठी पोषक मानले जातात. त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रानात उपलब्ध असलेल्या सर्व पालेभाज्या एकत्र करून भाजी बनवली जाते. त्यात अगदी अंबाडी, मेथी, पालक, शेपू, चुका या पालेभाज्यांसोबतच ओला हरभरा (होळा), वांगी, घेवडा, वाटाणा आणि गाजर यांचा वापर केला जातो..त्याशिवाय बाजारीच्या भाकरीसह ज्वारी आणि उडदाचे पीठ एकत्र करून (कळणा) त्याच्या कडक भाकरी बनवल्या जातात. तसेच गोड पदार्थ म्हणून गव्हाची खीर, पुरणपोळी, शेंगापोळी असते, त्याशिवाय सोलापूरची प्रसिद्ध शेंगदाणा चटणी आणि हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा या जेवणाची लज्जत आणखी वाढवतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.