Sangli News : आटपाडी तालुक्यात मेपासून पावसाने खरीप व फळपिकांचे नुकसान केले आहे. तालुक्यातील तिन्ही मंडलांत सरासरी ८०० मिमी पाऊस झाला, तर सप्टेंबरमध्ये सरासरी फक्त २०६ मिमी नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाचे प्रमाण दिघंची मंडलात आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ७०० मिमी इतक्या पावसाची पावसाची नोंद आहे..आटपाडी हा दुष्काळी तालुका आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असते. मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे पाण्याखाली शेतात खरीप पिके, भाजीपाला व फळबागा गेल्या. बाजरी, मूग, भुईमूग, सूर्यफूल पिके सडली. ढोबळी मिरची, वांगी, टोमॅटोसह भाजीपाला नष्ट झाला. .Rain Crop Damage : अस्मानीच्या तडाख्यात शेतकरी संकटात.११ हजार हेक्टरांतील खरीप, ३ हजार हेक्टरांतील भाजीपाला, ६ हजार हेक्टरांतील डाळिंब बागा व २ हजार ५०० हेक्टर इतर फळपिके पाण्याखाली आहेत. रब्बीची पेरणी अद्याप झाली नसल्यामुळे २५ हजार हेक्टरवर पेरणीचा भरोसा राहिलेला नाही..Rain Crop Damage : सांगलीच्या दुष्काळी तालुक्यांत पावसाचा फटका.परिणामी पुढील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपासून चारा टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी खते, औषधे व अन्य खर्चासाठी लाखो रुपये खर्च केले; परंतु पावसामुळे उत्पादन मिळेल, की नाही याची खात्री नाही. प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाईसाठी अर्ज करण्याचे मार्गदर्शन केले आहे; परंतु शेतकऱ्यांत चिंता कायम आहे..दृष्टिक्षेपात नुकसानखरीप क्षेत्र : ११,००० हेक्टरभाजीपाला : ३,००० हेक्टरडाळिंब बागा : ६,००० हेक्टरइतर फळपिके : २,५०० हेक्टररब्बी (अद्याप पेरणी नाही) : २५,००० हेक्टरपावसाचे प्रमाण (सप्टेंबर) : सरासरी २०६ मिमी, एकूण ७०० मिमीसर्वाधिक पाऊस (दिघंची) मंडलात ः २६९ मिमी, सरासरी ८१० मिमीपरिणाम : खरीप पिके कुजून गेली, भाजीपाला व फळबागा पाण्याखाली, रब्बी पेरणीवर परिणाम, चारा टंचाईची भीती.गतवर्षी अपेक्षित उत्पादन मिळाले त्यामुळे यंदा बागेची चांगली तयारी केली. खत, कीटकनाशक फवारणी, मशागतीसाठी आतापर्यंत तीन लाखांवर खर्च झाला आहे. आमच्याकडे सर्वांत जास्त पाऊस आतापर्यंत ८००, तर १५ दिवसांत २५० मिमी पाऊस झाला. त्यामुळे बागेला अद्याप फळ लागलेले नाही.- दीपक मोरे, दिघंची, नुकसानग्रस्त शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.