Climate Smart Farming: राईस सिटी अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आता भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. बदलती हवामान परिस्थिती, उत्पादन खर्चातील वाढ आणि रोख उत्पन्नाची गरज लक्षात घेता अनेक शेतकरी धानशेतीसोबत भाजीपाल्याचा पर्याय स्वीकारत आहेत. यंदाच्या उन्हाळी हंगामात जिल्ह्यात तब्बल ८८३.३५ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात आली असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे क्षेत्र वाढल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते..गोंदिया जिल्हा पारंपरिकरित्या धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेती धानावर आधारित असून खरीप आणि रब्बी हंगामात धानाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. मात्र, शेतीतील वाढते खर्च, मजुरीची समस्या आणि बाजारातील बदलती परिस्थिती यामुळे शेतकरी आता पर्यायी पिकांकडे वळत आहेत. विशेषतः भाजीपाल्यातून कमी कालावधीत रोख उत्पन्न मिळत असल्याने त्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे..Vegetable Farming: बहुविध भाजीपाला पिकांनी दिली शाश्वती.यंदा जिल्ह्यात वांगी, कारली, दोडका, भेंडी, काकडी, मिरची यांसारख्या भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. धानशेतीनंतर रिकामे राहणारे क्षेत्र भाजीपाल्याखाली आणण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. .Vegetable Farming: फेरपालट पद्धतीने भाजीपाला लागवडीवर भर.सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागात तर भाजीपाल्याचे क्षेत्र अधिक वाढताना दिसत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आठही तालुक्यांत भाजीपाला लागवड करण्यात आली आहे..यामध्ये गोंदिया तालुक्यात सर्वाधिक २४७.३० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड झाली आहे. त्याखालोखाल तिरोडा तालुक्यात १९१.३५ हेक्टर, सडक-अर्जुनी तालुक्यात १६७.६० हेक्टर, देवरी तालुक्यात १०६.२० हेक्टर, सालेकसा तालुक्यात ९०.४० हेक्टर, गोरेगाव तालुक्यात ८८.५० हेक्टर, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ३३.८० हेक्टर तर आमगाव तालुक्यात ३६.२० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. धानशेतीच्या तुलनेत भाजीपाल्यातून चार पैसे थेट हातात येत असल्याने अनेक शेतकरी या पिकांकडे वळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा भाजीपाला स्थानिक बाजारपेठेसह परजिल्हा आणि राज्यातील बाजारातही पाठविला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.