Solapur News: सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चालू गाळप हंगामात जिल्ह्यातील सर्वाधिक ऊसदर देणार, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी व्यक्त केला..कारखान्याच्या नवीन हंगामाचा प्रारंभ बुधवारी (ता. १२) ओंकार शुगरचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे आणि संचालिका रेखा बोत्रे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सुरुवातीला बॉयलर पूजन संचालक तानाजी सरदार व राजश्री सरदार यांच्या हस्ते, तर गव्हाण व काटापूजन संचालक राजाराम जगदाळे व रंजना जगदाळे यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी काळे बोलत होते. या वेळी व्हाईस चेअरमन भारत कोळेकर, मालनबाई काळे, मोहन नागटिळक, गोरख जाधव, अण्णा शिंदे, दिनकर कदम, योगेश ताड, युवराज दगडे, परमेश्वर लामकाने, जयसिंह देशमुख उपस्थित होते..Sugarcane Price Issue: ऊसदर जाहीर न केल्यास तोडी बुधवारपासून बंद : राजू शेळके.श्री. काळे म्हणाले, ‘‘मागील पाच-सहा वर्षांत कारखाना आर्थिक संकटातून जात असतानाही आम्ही संस्था टिकवून ठेवली. शेतकऱ्यांना वेळेवर आणि शक्य तितका जास्त दर मिळावा, यासाठी ओंकार ग्रूपच्या सहकार्याने कारखाना पूर्णपणे सहयोगी तत्त्वावर चालविला जाणार आहे. कारखाना भाडे तत्त्वावर किंवा भागीदारीमध्ये दिलेला नाही. शासनादेशानुसारच सर्व प्रक्रिया होतील.’’.श्री. बोत्रे-पाटील म्हणाले, ‘‘दिवंगत नेत्यांनी मोठ्या परिश्रमाने उभे केलेले कारखाने बंद पडू नयेत. शेतकरी आणि कामगारांना योग्य दाम मिळणे महत्त्वाचे आहे. कारखाने कर्जमुक्त व्हावेत, सुरळीत चालावेत, यासाठी ओंकार ग्रूप कटिबद्ध आहे. तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही वजन काट्यावर उसाचे वजन करण्याची मुभा असेल आणि वजनात कोणतीही तफावत होणार नाही, याची हमी देऊ.’’.‘जकराया’ सर्वाधिक ऊसदर देणार : जाधव.प्रभारी कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. समाधान काळे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक युवराज दगडे यांनी आभार मानले..दर पंधरा दिवसांनी बिले देणारया हंगामात साडेपाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. प्रत्येक १५ दिवसांनी शेतकऱ्यांना गाळपाचे पैसे तोडणी-वाहतूकदारांची वेळेवर बिले दिली जातील. तसेच कामगारांना दरमहा वेतन, असे नियमित आर्थिक व्यवहार कारखान्याकडून केले जाणार आहेत, असेही श्री. बोत्रे म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.