दिनेश इथापे, डॉ. सुनील दळवी, डॉ. अशोक कडलगवसंत ऊर्जा जिवाणू खतांसोबत वापरल्यास जमिनीतील आणि मुळांवरील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. जैविक स्राव निर्मिती वाढवते. मुळांची वाढ आणि मुळांमधून स्रवणाऱ्या द्रव्यांचे प्रमाण सुधारून उपयुक्त सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे मातीतून अन्नद्रव्यांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते..बदलत्या हवामानामुळे पिकांवर अजैविक (अति थंडी, उष्णता, दुष्काळ, पूर) आणि जैविक (रोग, कीड) ताणांचा परिणाम वाढत आहे. वाढता थंडीचा जोर पाहता ऊस, भाजीपाला, रब्बी व इतर फळपिकांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. थंडीमुळे पिकांमध्ये उगवण कमी होणे, वाढ खुंटणे, पाने पिवळी पडणे, फुले व फळांची गळ, फळे तडकणे व साठवण गुणवत्तेत घट अशा समस्या दिसून येतात. यासाठी वसंत ऊर्जा या नैसर्गिक, सुरक्षित व पर्यावरणपूरक जैवसंजीवकाचा वापर इथ्रेल, युरिया, पोटॅश, झिंक यांसारखे रासायनिक निविष्ठापेक्षा अधिक शाश्वत पर्याय आहे. थंडीमुळे पिकांमध्ये मुख्यतः रूपात्मक, जैवरासायनिक पातळीवर बदल होतात..Bio Fertilizers: शाश्वत उत्पादनासाठी जिवाणू खतांचा वापर.रूपात्मक बदलअति थंडीमुळे सुरुवातीच्या अवस्थेत बियांची उगवण व वाढ मंदावते, पाने पिवळी पडून प्रकाशसंश्लेषण घटते, झाडांचा जैवभार कमी होतो तसेच फळपिकांमध्ये फळे तडकणे, नरम पडणे व टिकवण क्षमता घटते.जैवरासायनिक बदलकमी तापमानामुळे चयापचय मंदावून हायड्रोजन पेरॉक्साइड व अतिक्रियाशील ऑक्सिजन संयुगे वाढतात, ज्यामुळे पेशीभित्तिका व पेशीकार्य बाधित होऊन उगवण, प्रकाशसंश्लेषण, वाढ, उत्पादनाचा दर्जा घटतो आणि रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढतो..वापर आणि फायदावसंतदादा शुगर इन्टिट्यूट आणि भाभा अणू संशोधन संस्था यांच्या संयुक्त संशोधनातून गॅमा विकिरण या तंत्रज्ञानाच्या आधारे वसंत ऊर्जा निर्मिती करण्यात आली आहे. हे जैवसुसंगत, बिनविषारी, जैवविघटनशील आणि वनस्पतींसाठी जैवसंजीवक म्हणून कार्य करते. कृषी विद्यापीठांच्या ॲग्रेस्कोमध्ये याची शिफारस आहे.वसंत ऊर्जा हायड्रोजन पेरॉक्साइड, जॅस्मोनिक आम्ल, सॅलिसिलिक आम्ल व इथिलीन-आधारित संदेशवहन सक्रिय होऊन कायटीनेज व बीटा-ग्लुकानेजसारख्या ताणसहनशीलता वाढविणाऱ्या विकरांची निर्मिती संपूर्ण वनस्पतीत वाढते. यामुळे जैविक व अजैविक ताणांना वनस्पती जलद व प्रभावी प्रतिसाद देते..Illegal Bio-Fertilizer : जांभूडला सूक्ष्म अन्नद्रव्याचा विनापरवाना साठा पकडला.पेरणीथंड वातावरणात जैवरासायनिक क्रिया मंदावतात अशा वेळी बेणे/बीज प्रक्रिया केल्यास बियाण्यातील जिबरेलिक अॅसिड आणि इंडोल अॅसेटिक आम्ल संबंधित जैवरासायनिक क्रिया सक्रिय होतात.बीज अंकुरण व रोपांच्या प्रारंभीच्या सशक्त वाढीसाठी आवश्यक विकरांची कार्यक्षमता वाढते. बियाण्याची उगवण जलद व एकसारखी होते, रोपे सशक्त व निरोगी निपजतात.बियाणे व पानांभोवती तयार होणारा सूक्ष्म थर आणि आंतरकोषीय वाढीव प्रतिकारक्षमता मातीतून होणाऱ्या विविध रोग आणि रसशोषक किडींपासून संरक्षण करतो..वाढीवर परिणामकमी तापमानामुळे पर्णकोशिकांचे नुकसान होऊन पेशीभित्तिकांना तडे जातात, प्रकाशसंश्लेषणात घट होऊन पिकाची वाढ मंदावते.वसंत ऊर्जा पानांवर फवारणी केल्यास ती नैसर्गिक शक्तिवर्धकाप्रमाणे कार्य करते. पिकातील संरक्षण यंत्रणा सक्रिय होतात आणि अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व क, ग्लुटाथायोन, फिनॉलिक्स व फ्लॅव्होनॉइड्स यांचे प्रमाण वाढते.प्रोलिन, विविध शर्करा व मुक्त अमिनो आम्लामुळे पेशींतील पाण्याचा समतोल राखला जातो. पेशीद्रव्य गोठण्याचा धोका कमी होतो..Bio Fertilizers: जिवाणू खतांचा पिकांना कसा फायदा होतो ?.कॅलोस, लिग्निन, सेल्युलोज व पेक्टिन प्रमाण वाढून पेशीभित्तिका मजबूत बनतात. नैसर्गिक गोठणविरोधकासारखे काम करतात.थंडीमुळे हवेतील सापेक्ष आद्रता कमी होते, पानांमधून बाष्पीभवनाचा वेग वाढतो; वसंत ऊर्जाच्या पानांवरील सूक्ष्म आवरणामुळे पर्णरंध्राद्वारे होणाऱ्या वायूंची देवाणघेवाण आणि बाष्प उत्सर्जन नियंत्रित राहते तसेच पेशीमधील पाण्याचा समतोल राखला जातो. सोबतच जमिनीतून पाणी व अन्नद्रव्य शोषण सुधारते, धुक्यामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो..कृषी निविष्ठांची कार्यक्षमतेत वाढजिवाणू खतांसोबत वापरल्यास जमिनीतील आणि मुळांवरील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या, वसाहत, बायोफिल्म आणि जैविक स्राव निर्मिती वाढवते, रोगकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस आळा घालते.मुळांची वाढ व मुळांमधून स्रवणाऱ्या द्रव्यांचे प्रमाण सुधारून उपयुक्त सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढवते, ज्यामुळे मातीतून अन्नद्रव्यांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते.विद्राव्य खतांसोबत वापरल्यास खतांच्या कणांभोवती संयुग तयार होऊन अन्नद्रव्ये पिकाला गरजेनुसार, योग्य वेळी व योग्य प्रमाणात हळूहळू व दीर्घकाळ उपलब्ध होतात. त्यामुळे अपव्यय कमी होऊन परिणाम अधिक प्रभावी मिळतो..उत्पादन वाढ आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो.वापरामुळे संरक्षणासाठी तयार झालेली साखर व इतर अन्नद्रव्ये उत्पादन वाढीस आणि दर्जा सुधारण्यास मदत करतात.तयार होणारा पातळ संरक्षक थर रोग-कीड, अति थंडीमुळे होणारी इजा, वजन घट, कमी करतो. फळांचा गोडवा, चव व कडकपणा टिकून राहतो.ही निविष्ठा पर्यावरणपूरक असल्यामुळे माती, पाणी व सजीवांना हानी न पोहोचविता सुरक्षितपणे वापरता येते. बदलत्या हवामानात पिकांची वाढ व ताकद टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक उपाय आहे..बीज प्रक्रिया आणि फवारणीसाठी ५ मिलि प्रति लिटर या प्रमाणात द्रावण करून वापर करावा.फवारणीसाठी वापरले जाणारे पाणी स्वच्छ आणि क्षार मुक्त असावे, पाण्याचा सामू ५.५ ते ६.५ असावा.फवारणी करताना वाऱ्याचा वेग कमी असावा. फवारणी शक्यतो सकाळी लवकर किवा संध्याकाळी उशिरा करावी.शक्यतो रासायनिक कीटक नाशक, बुरशीनाशक आणि इतर निविष्ठा सोबत वापर टाळावा. गरज असल्यास रासायनिक निविष्ठासोबत वापरावे. - डॉ. सुनील दळवी ९८२२८३४२४७(शास्त्रज्ञ, उतिसंवर्धन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.