Orange Production: सुमारे ७० हजार हेक्टरवरील संत्रा लागवडीमुळे विदर्भातील वरुड आणि मोर्शी तालुक्यांतील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडले आहेत. मृग बहरातील संत्र्यांची मोठ्या प्रमाणावर फळगळ सुरू झाल्याने यंदाच्या हंगामातील उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.