Palghar News: वाणगावजवळील कोलवलीतील सेंद्रिय खतांचा वापर केलेली हळद अमेरिका, दुबई, आयर्लंडमध्ये पाठवली जात आहे. त्यामुळे निसर्गाचा ढासळलेला समतोल, बदलते हवामान, पावसाचे अनिश्चित स्वरूपात शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांना महत्त्व आले आहे. .जिल्ह्यातील शेतकरी वर्ग हा आधुनिक विचारसरणीचा असल्याने शेतीत अनेक प्रयोग करत आहे. डहाणू तालुक्यातील वाणगाव जवळील कोलवली येथील प्रगतशील शेतकरी अनिल पाटील यांनी २० गुंठे क्षेत्रावर सेंद्रिय सेलम जातीच्या हळदीची लागवड केली आहे. .Turmeric Export: पाच महिन्यांत हळदीची ८० हजार टन निर्यात.गेल्या वर्षी ५०० किलो हळद पावडरची ३५० रुपये प्रति किलो दराने विक्री केली आहे. त्यातून खर्च वजा करता दीड लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला होता. तर आता एक एकर क्षेत्रावर हळद लागवड केली आहे..Turmeric Export : हळदीच्या उत्पादनासह निर्यातीला मिळणार चालना.पोषक वातावरणपालघर जिल्ह्यातील हवामान हळदीच्या पिकासाठी अनुकूल आहे. उष्ण, दमट हवामान हळद पिकासाठी पोषक आहे. विशेषतः पावसाळा, त्यानंतरचा कोरडा ऋतू पिकासाठी फायदेशीर ठरतो. पालघरमध्ये तापमान साधारणपणे २० ते ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. जून ते सप्टेंबर पडणारा पाऊस हळदीच्या लागवडीसाठी महत्त्वाचा असतो..सेंद्रिय पद्धतीच्या हळद निर्मितीतून ग्राहकांच्या आरोग्याला फायदा होत असल्याने वेगळे समाधान मिळत आहे. परंतु, कमी जागेत, कमी खर्चात, शाश्वत उत्पादन देणारे हळद पीक असल्याने शेतकऱ्यांनी चांगला नफा मिळवणे शक्य आहे.- अनिल पाटील, हळद उत्पादक, कोलवली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.