Motherhood Responsibility: ‘‘ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या एकविसाव्या शतकात जगातील प्रत्येक गोष्ट तळहातावर उपलब्ध झाली आहे. ही एक मोठी उपलब्धी असली तरी, या तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि सुयोग्य वापर करण्यासाठी संस्कारक्षम पिढी घडविणे ही आजच्या मातृशक्तीची प्राथमिक जबाबदारी आहे,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (एमसीएईआर), पुणेच्या महासंचालक श्रीमती वर्षा लढ्ढा (उंटवाल) यांनी केले..डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी (ता. २८) विदर्भस्तरीय महिला सक्षमीकरण मेळावा व ‘स्त्री शक्ती उत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते..Free Education Scheme: खासगी विद्यापीठांत मुलींना १०० टक्के मोफत शिक्षण नाहीच.आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. शरद गडाख यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर दिला. ते म्हणाले की, ‘‘ महिलांच्या उल्लेखनीय योगदानामुळेच शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास शक्य आहे. ग्रामीण भागात उत्पादित होणाऱ्या शेतीमालावर गावपातळीवरच प्रक्रिया होणे गरजेचे आहे. विद्यापीठाकडे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान आणि माहितीचा महिलांनी लाभ घेऊन उद्योजक बनावे.’’.१५ ‘स्वयंसिद्धा’ रणरागिणींचा गौरवया सोहळ्यात शेती आणि पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विदर्भातील १५ महिलांना ‘स्वयंसिद्धा २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..यामध्ये श्रीमती रसिका बळीराम मारगाये(मुस्का ता. धानोरा जिल्हा गडचिरोली), श्रीमती.रेखा उल्हास वंजारी ( सानगडी ता.साकोली जिल्हा भंडारा), माधुरी सचिन वडतकर (गोपापूर ता. देवळी जिल्हा वर्धा), विजयालक्ष्मी मनीषकुमार मानकर (खमारी, जिल्हा गोंदिया), श्रीमती रवीना पुराम (शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर ), प्राची जयेश मिरासे ( मिरासे ता. दारव्हा जिल्हा यवतमाळ ), सावित्रीबाई फुले महिला उत्पादक गट (जळगाव नहाटे ता.अकोट जिल्हा अकोला), प्रतिभा गजानन तायडे ( अमरावती),..Education Reform: शिक्षणात सुधारणा ही सामूहिक जबाबदारी .मीना गोपाल जाधव ( रिथद ता.रिसोड जिल्हा वाशिम), उषा सुधीरराव देशमुख ( पिंजर ता. बार्शी टाकळी जिल्हा अकोला), शालिनी गणेश वानखेडे (वडशिंगी, ता.जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा), शिल्पा मनोज बुरड (बुलढाणा), श्रुती अशोकराव बालिंगे (यवतमाळ), अरुणा दिनेश बनसोड ( कुसुमकोट खुर्द ता. धारणी जिल्हा अमरावती), राधा रवी पागृत (खरप बु. जिल्हा अकोला) यांचा समावेश होता..याप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना आणि परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्रीमती ईशानी आनंद यांनीही महिलांना मार्गदर्शन करत स्वप्नांना परिश्रमाची जोड देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला कुलसचिव प्रीती रोडगे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रेरणा चिकटे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. अरुणा काटोले यांनी आभार मानले.\.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.