कल्याणी थोटे, डॉ. श्रुतिका देवRural Entrepreneurship Story: पेरू हे अत्यंत नाशवंत फळ असल्यामुळे त्याची साठवणक्षमता मर्यादित असते.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारा अपव्यय टाळण्यासाठी पेरू प्रक्रिया व मूल्यवर्धनास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पेरूचे पोषणमूल्य अत्यंत महत्त्वाचे आहे..हे फळ जीवनसत्त्व क, आहारतंतू, कॅल्शिअम, फॉस्फरस व पेक्टिनचे समृद्ध स्रोत आहे. विशेषतः पेरूमधील नैसर्गिक पेक्टिनमुळे जेली, जॅम व इतर घट्ट स्वरूपातील उत्पादने उच्च दर्जाची तयार करता येतात. उत्कृष्ट चव, पौष्टिकता आणि जवळजवळ संपूर्ण खाद्य भाग यामुळे पेरू ताज्या फळांप्रमाणेच प्रक्रिया उद्योगासाठीही उपयुक्त ठरतो..Milk Processing: पोषणमूल्य जपण्यासाठी दुधावर प्रक्रिया.प्रक्रिया उत्पादनेपल्प निर्मितीसाठी पिकलेली, निरोगी व कीड-रोगमुक्त फळे निवडून ती स्वच्छ धुऊन तुकडे केली जातात. पल्पर किंवा ब्लेंडरमध्ये प्रक्रिया करून बिया व तंतुमय भाग वेगळा केला जातो. प्राप्त झालेल्या पल्पला योग्य उष्णता प्रक्रिया व संरक्षकांच्या साहाय्याने साठविले जाते. योग्य तापमानावर साठविल्यास हा पल्प अनेक महिने टिकतो व पुढे रस, आरटीएस पेये, नेक्टर व इतर उत्पादने तयार करण्यासाठी वापरता येतो..पेरू रस ताज्या फळांपासून किंवा साठविलेल्या पल्पपासून तयार करता येतो. रसामध्ये नैसर्गिक कॅरोटिनॉइड्स व अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. पेक्टिक एन्झाइम्सचा वापर केल्यास रस उत्पादन वाढते, व्हिस्कॉसिटी कमी होते, त्यामुळे रसाची गुणवत्ता सुधारते..Agro Processing Industry: घरोघरी उभे राहावेत प्रक्रिया उद्योग.आरटीएस पेय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. पेरू पल्प किंवा रसामध्ये पाणी, साखर व आम्लतेचे योग्य प्रमाण ठेवून हे पेय तयार केले जाते. पाश्चरायझेशननंतर योग्य पॅकिंगमध्ये साठविल्यास हे पेय काही महिने सुरक्षित राहते..पेरू नेक्टर हे गोड, पौष्टिक व थेट सेवनासाठी उपयुक्त पेय आहे. यामध्ये विद्राव्य घन पदार्थ, आम्लता व पीएच यांचे मानक प्रमाण राखणे महत्त्वाचे असते. योग्य साठवण परिस्थितीत पेरू नेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व क टिकून राहते..पेरूपासून टॉफी, जेली आणि इतर मिठाईजन्य उत्पादनेही मोठ्या प्रमाणावर तयार केली जातात. पेरूमधील नैसर्गिक पेक्टिनमुळे उच्च दर्जाची जेली सहज तयार होते. योग्य पॅकिंगमध्ये पेरू टॉफी दीर्घकाळ टिकते.पेरू पावडर व निर्जलित पेरू तुकडे ही दीर्घकालीन साठवणक्षम उत्पादने असून त्यांचा वापर पेय, बेकरी, बाल आहार आणि स्नॅक्समध्ये केला जातो.- डॉ. श्रुतिका देव ९९६०४८९५९९(इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस ॲण्ड टेक्नॉलॉजी, एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर ).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.