Paddy Farming: सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात जोरदार, तर उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टरपैकी ४० हजार हेक्टरवरील भात पुनर्लागवड पूर्ण झाली असून, चांगला पाऊस झाल्यास पुढील दहा ते बारा दिवसांत उर्वरित लागवडही पूर्ण होण्याचा अंदाज आहे..चार-पाच दिवस खंड पडलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने खोळंबलेली भात पुनर्लागवड वेगाने सुरू झाली आहे. यंदा जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर भात लागवडीचे नियोजन असून, त्यापैकी आतापर्यंत ४० हजार हेक्टरवरील पुनर्लागवड पूर्ण झाली आहे..Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात वादळी पावसामुळे अनेक भागांत पडझड.गेल्या दोन दिवसांपासून वैभववाडी तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. सकाळी हलक्या सरी, त्यानंतर उघडीप व कडक ऊन, तर सायंकाळी मुसळधार पाऊस, असे चित्र सध्या तालुक्यात आहे. रविवारी सायंकाळीही वैभववाडीला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यात गेल्या २४ तासांत ५८ मिमी पावसाची नोंद झाली..Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गात कमी-अधिक जोर.उर्वरित तालुक्यांमध्ये मात्र हलक्या सरी सुरू असून काही ठिकाणी पूर्णपणे उघडीप आहे. आज सकाळपासूनही जिल्ह्यात कडक ऊन पडले आहे. किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांत अधूनमधून हलक्या सरी पडत आहेत..जिल्ह्यात अद्याप १५ हजार हेक्टरवरील भात पुनर्लागवड बाकी आहे. येत्या दहा ते बारा दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास ही लागवड पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे..सांगली जिल्ह्यात हलका पाऊससांगली : जिल्ह्यात रविवारी ( ता. १९) सायंकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासात ९.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या २० तारखेपर्यंत १३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वारणा धरणात २३.०३ टीएमसी साठा झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.