Nagpur News : राज्यातील वनसंवर्धन व संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वन विभागात तब्बल २४०८ पदे रिक्त आहेत. ही बाब माहिती अधिकारात उघड झाली. यात सर्वाधिक रिक्त पदे गट ‘क’ गटातील आहेत..राज्यातील वन विभागासाठी हजारो पदे मंजूर असली तरी त्यापैकी गट ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ या चार गटांतील तब्बल २४०८ पदे रिक्त आहेत. यात प्रधान मुख्य वनसंरक्षक, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, वनसंरक्षक, वरिष्ठ स्वीय सहायक, स्वीय सहायक, उपवनसंरक्षक, विभागीय वन अधिकारी, उपसंचालक महसूल व वन विभाग (वने), वनअभियंता, सहायक वनसंरक्षक, प्रशासकीय अधिकारी, वनसांख्यिक, सहायक आयुक्त पशुसंवर्धन (वन्यजीव), उपायुक्त पशुसंवर्धन (वन्यजीव), सहायक संचालक, उपवन अभियंता, वनजमाबंदी अधिकारी (प्रतिनियुक्ती), पशुवैद्यकीय अधिकारी अशी एकूण ‘अ’ गटातील १२८ पदे रिक्त आहेत. .Forest Department : खालापुरात वणव्यांचा कहर! जंगलसंपत्तीला धोका.तर ‘ब’ गटातील कार्यालय अधीक्षक वनरक्षक, वनक्षेत्रपाल, शाखा अभियंता, सहायक वनसांख्यिकी अशी २८४ तर ‘क’ गटातील मुख्य लेखापाल, लेखापाल, लिपिक, वनपाल, वनरक्षक, सर्व्हेक्षक यांसारख्या मैदानी स्तरावर कार्यरत पदांची तब्बल १७५८ पदे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांचा थेट संबंध जंगल तसेच वन प्राण्यांशी आहे..रिक्त पदांच्या परिणामी गस्तदेखील प्रभावी झाल्याने वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे जंगल आणि वन्य प्राण्यांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. त्याची दखल घेत शासनाने तत्काळ भरती प्रक्रिया राबवीत रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. अन्यथा, जैवविविधता जपणे, जंगलातील कायदा व सुव्यवस्था राखणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष रोखणे कठीण होईल, अशी भीती वर्तविली जात आहे..Forest Department Scam : मंगळवेढा वनविभागात १०९ कोटी रुपयांचा अपहार.शासन स्तरावर प्रस्ताव दाखलशासन स्तरावर या पदभरतीसाठी प्रस्ताव दाखल झाले असले तरी अद्याप प्रत्यक्ष भरतीला वेग मिळालेला नाही. वन विभागातील रिक्त पदांचे ग्रहण हा मुद्दा केवळ कर्मचारी वर्गाचाच नाही तर संपूर्ण समाजाच्या पर्यावरणाशी निगडित असल्याने तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे..जंगलात जमीनस्तरावर कार्य करणाऱ्या गट ‘क’, गट ‘ड’ कर्मचाऱ्यांची प्रमुख पदे रिक्त आहेत. तर अधिकाऱ्यांना दिशानिर्देश देणाऱ्या गट ‘अ’ची अशी २ हजार ४०८ प्रमुख पदे रिक्त आहे. ही माहिती शासनाने माहिती अधिकारांतर्गत दिली आहे. याचा कामकाजावर परिणाम दिसून येत आहे.- अभय कोलारकर, माहिती अधिकार कार्यकर्ता, गपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.