Lucknow News: उत्तर प्रदेश शासनाने २०२५-२६ या गाळप हंगामासाठी राज्यात गाळप होणाऱ्या उसास प्रति टन ३०० रुपयांची वाढ (क्विंटलला ३० रुपये) करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वाढीनंतर लवकर पिकणाऱ्या ऊस वाणाचा दर ४००० रुपये प्रति टन, सामान्य वाणाचा दर ३९०० रुपये प्रति टन असा निश्चित करण्यात आला आहे..राज्याचे ऊस विकास व साखर उद्योगमंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी बुधवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वाढीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ३,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा निर्णय लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे..Sugarcane Price Hike: योगी सरकारचा मोठा निर्णय, उसाच्या राज्य निर्धारित मुल्यात बंपर वाढ, ४६ लाख शेतकऱ्यांना फायदा.मंत्री चौधरी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करणे हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ऊस उत्पादक हे फक्त अन्नदाते नाहीत, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचे मजबूत आधारस्तंभ आहेत. त्यांना योग्य दर व वेळेत देयक देणे ही आमची बांधिलकी आहे.’’ राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योगी सरकारच्या कार्यकाळात २ लाख ९० हजा र२२५ कोटी रुपये इतकी देयके अदा करण्यात आली आहेत..तर २००७ ते २०१७ या काळात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष सरकारच्या कार्यकाळात १ लाख ४७ हजार ३४६ कोटी रुपये इतकीच देयके अदा झाली होती. म्हणजेच, सध्याच्या सरकारने केवळ आठ-साडेआठ वर्षांतच १ लाख ४२ हजार ८७९ कोटी रुपयांची अधिक देयके शेतकऱ्यांना दिली आहेत. सध्या उत्तर प्रदेशात १२२ साखर कारखाने कार्यरत असून, साखर उत्पादनाच्या बाबतीत हा राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.’’.Kolhapur Sugarcane Price Protest: कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण, ३ ट्रॅक्टर पेटवले .ते म्हणाले, ‘‘पूर्वीच्या सरकारांच्या काळात २१ कारखाने स्वस्तात विकले गेले, मात्र योगी सरकारच्या पारदर्शक धोरणांमुळे व उद्योगपूरक वातावरणामुळे साखर उद्योगात १२ हजार कोटी रुपयांहून अधिक नवीन गुंतवणूक झाली आहे. गेल्या आठ वर्षांत राज्यात चार नवीन साखर कारखाने सुरू झाले. सहा बंद कारखान्यांचे पुनरुज्जीवन आणि ४२ कारखान्यांची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे..या विस्तारामुळे एकूण गाळप क्षमतेत आठ मोठ्या कारखान्यांच्या बरोबरीची भर पडली आहे. इथेनॉल उत्पादनाच्या क्षेत्रातही राज्याने मोठी झेप घेतली आहे. उत्पादन ४१ कोटी लिटरवरून १८२ कोटी लिटरपर्यंत वाढले असून, डिस्टिलरींची संख्या ६१ वरून ९७ वर पोहोचली आहे. राज्यातील ऊस लागवडीचे क्षेत्रदेखील २० लाख हेक्टरवरून २९.५१ लाख हेक्टरपर्यंत वाढले असून, उत्तर प्रदेश देशातील सर्वांत मोठा ऊस उत्पादक राज्य म्हणून अग्रस्थानी पोहोचला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.