Sugarcane Oilseeds Pulses Intercropping Model: उत्तर प्रदेशात उसामध्ये तेलबिया आणि कडधान्यांचे आंतरपीक घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. शेती क्षेत्राला नवी गती देण्यासाठी उसासोबत तेलबिया आणि कडधान्यांचे आंतरपीक घेणे सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीनेच नव्हे अनेक पटींनी वाढू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे..याबाबत आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, उसासोबत मोहरी, मसूर, उडीद आणि मूग यांसारख्या उच्च मूल्य पिके आंतरपीक म्हणून घेतल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन, कमी खर्च आणि वर्षभर स्थिर उत्पन्नाची खात्री मिळेल. यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल..राज्यात लागवडीयोग्य शेतजमिनीची व्याप्ती वाढवणे आता शक्य नाही. एक ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रतियुनिट क्षेत्रातील पीक उत्पादनात वाढ करणे हाच एकमेव मार्ग आहे. उसावर आधारित आंतरपीक पद्धत हे उत्तर प्रदेशातील शेतीच्या भविष्यासाठी एक नवीन मॉडेल आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकाच वेळी भरघोस उत्पादन, अधिक उत्पन्न आणि जोखमीपासून संरक्षण मिळेल, असे आदित्यनाथ यांनी म्हटले आहे..Ratoon Intercropping: आंतरपिके घेतल्याचा खोडवा उसाला काय फायदा होतो?.हा उपक्रम २०२६-२७ ते २०३०-३१ दरम्यानच्या कालावधीत ‘मिशन मोड’मध्ये राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सध्या उत्तर प्रदेशात २९.५० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक घेतले जाते. त्यात १४.६४ लाख हेक्टरवर नवीन लागवड क्षेत्र आणि १४.८६ लाख हेक्टरवरील खोडवा पीक क्षेत्राचा समावेश आहे..Rabi Intercropping : एकाच बागायती जमिनीत दोन पिके; आंतरपीक शेतीतून उत्पादन आणि नफा वाढवा!.एवढ्या मोठ्या ऊस पीक क्षेत्रात तेलबिया आणि कडधान्यांचे आंतरपीक घेतल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल आणि राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर तेलबिया आणि कडधान्यांच्या बाबतीत आत्मनिर्भरत होण्यास नवे बळ मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ऊस उत्पादनावर कोणताही परिणाम न होता अधिक पिके, अतिरिक्त नफा आणि अतिरिक्त सुरक्षा ही या मॉडेलची सर्वात मोठी वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी वर्षनिहाय आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी केली आहे..या अतिरिक्त उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि याचे राज्याच्या सकल मूल्यवर्धनात (GVA) मोठे योगदान राहील, असेही त्यांनी सांगितले. ही शेती उपक्रम केवळ ऊस पीक क्षेत्रातील शेतकऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता, राज्याच्या एकूण शेती क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारा उपक्रम म्हणून राबवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.