सामान्य सल्ला भात कापणीसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी विकसित केलेल्या ‘वैभव विळा’ च्या साहाय्याने करावे. त्यामुळे पुढील वर्षी भात पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पेंढ्याच्या उत्पादनात वाढ होते.भात पिकाची कापणी झाल्यानंतर शेतात वाफसा असल्यास लगेच नांगरट करावी. त्यामुळे भाताची धसकटे मातीत मिसळले जातील आणि किडीच्या सुप्त अवस्था उघड्या पडून सूर्यप्रकाशाच्या मदतीने नैसर्गिकरीत्या नष्ट होतील..रब्बी पिकांची पूर्वमशागत, पेरणी तसेच रोपवाटिकेची तयारी ही सर्व कामे जमिनीत वाफसा स्थिती असताना करावीत.रब्बी पिकांची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यांवर योग्य बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. जेणेकरून बियाण्यातून व मातीतून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होईल.आंबा आणि काजू बागांमध्ये नवीन पालवी येत असल्यामुळे किडीच्या प्रादुर्भावासाठी बागांची नियमितपणे पाहणी करावी..Farmer Advice: शेतकऱ्यांनो जमीन विकू नका, उद्योगांत भागीदारी मागा; राज ठाकरे .कोबी/ नवलकोल कोबी आणि नवलकोल पिकाच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी. रोपे तयार करण्याकरिता ३ मी. लांब, १ मी. रुंद आणि १५ से.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. तयार वाफ्यावर १२ ते १५ सें.मी. अंतरावर विरळ बी पेरून मातीने हलक्या हाताने झाकून घ्यावे, त्यानंतर झारीने हलके पाणी द्यावे. बी बारीक असल्याने चाळलेल्या बारीक वाळूमध्ये समप्रमाणात मिसळून पेरणी करावी. .वांगी/मिरची/टोमॅटो रब्बी हंगामासाठी मिरची, वांगी, टोमॅटो या पिकांची रोपे तयार करण्याकरिता जमीन वाफसा स्थितीत असताना मशागतीची कामे सुरु करावीत. रोपवाटिकेसाठी रोगप्रतिरोधक वाणांचा वापर करावा. गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत ५०० किलो प्रति गुंठा मिसळावे. शेणखत देण्यापूर्वी त्यामध्ये ट्रायकोडर्मा मिसळून घ्यावे. त्यामुळे मातीतून पसरणाऱ्या रोगांचे नियंत्रण होते. .Astrology Advice : रविवारी कोणत्या गोष्टी करू नयेत? काय सांगत शास्त्र.गादीवाफे ३ मी. लांब × १ मी. रुंद × १५ सें.मी. उंचीचे तयार करावेत. पेरणीच्या वेळेस गादीवाफ्यावर प्रति चौरस मीटर ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळून १० सें.मी. अंतरावर ओळीने बियाण्याची पेरणी करावी. पेरणी करण्याअगोदर बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति बियाणास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करतेवेळी किंचित पाणी लावून जैविक बुरशीनाशकाचे पातळ आवरण बियाण्याभोवती तयार होईल असे पहावे.बियाणे रुजून आल्यानंतर रोपवाटिकेतील प्रत्येक गादीवाफ्यावर पेरणीनंतर सुमारे १५ दिवसांनी ५० ग्रॅम युरियाची मात्रा द्यावी. त्यामुळे रोपांची वाढ चांगली होण्यास मदत मिळते..कलिंगड कलिंगड पिकाच्या लागवडीसाठी जमीन वाफसा स्थितीत आल्यावर मशागतीची कामे करावीत. लागवड सरी पद्धतीने २ बाय ०.५० मी. अंतरावर करावी.कलिंगड पिकाची लागवड काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या (२० ते ३० मायक्रॉन) आच्छादन वापरून करावयाची असल्यास जमिनीची नांगरट करून जमीन समपातळीत आणावी. त्यानंतर ५ ते ७ सेंमी उंचीचे व ६० सेंमी रुंदीचे गादीवाफे आच्छादनासाठी तयार करावेत. दोन गादीवाफ्यामधील अंतर २ मीटर ठेवावे. ठिबक सिंचन वापरावयाचे असल्यास आच्छादन अंथरण्यापूर्वी ठिबकच्या नळ्या वाफ्यावर पसरून घ्याव्यात. त्यानंतर प्लास्टिक आच्छादन गादीवाफ्यावर अंथरावे व कडांवर मातीचा थर द्यावा. आच्छादनावर दोन ओळींमधील अंतर ४५ सें.मी. ठेवून ३ सें.मी. व्यासाची छिद्रे रुंदीच्या दिशेने पाडावीत. त्यानंतर लांबीच्या दिशेने ५० सें.मी. अंतरावर सरळ रेषेत ३ सेंमी व्यासाची छिद्रे पाडावीत. आच्छादनावर पाडलेल्या छिद्रात २ ते ३ सेंमी खोलीवर बियाण्याची पेरणी करावी..Agriculture Advice : संत्रा उत्पादनात सेंद्रिय कर्ब आणि घटकांचा वापर महत्त्वाचा; पाटील यांचे मत.पेरणीच्या वेळेस प्रति आळ्यास १.५ किलो चांगले कुजलेले शेणखत, ११ ग्रॅम युरिया, ३२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा द्यावी. तसेच संकरित कलिंगडाला पेरणीच्या वेळेस २ किलो चांगले कुजलेले शेणखत, २० ग्रॅम युरिया, ३२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि १७ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खत मात्रा प्रति आळे द्यावी. खतांचा थेट बियाण्यांशी येणार नाही याची दक्षता घ्यावी. .रोपांचे मर रोगापासून संरक्षण करण्याकरिता पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा २ ग्रॅम प्रति आळे प्रमाणे शेणखतामध्ये मिसळून द्यावे. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे. ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करताना ९० दिवसांच्या पीक कालावधीकरिता एकूण नऊ हप्त्यामध्ये खत व्यवस्थापन करावे. पेरणीनंतर १५ दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे खते देण्यास सुरुवात करावी. .खत व्यवस्थापन(एक आठवड्याच्या अंतराने)पीक अवस्थाएकूण हफ्तेप्रति एकर प्रति हप्ता खत मात्रा१९:१९:१९ युरिया ०:०:५०सुरुवातीचा कालावधी ३ १२ किलो १९ किलो ४ किलोवाढीची अवस्था ३ १२ किलो १९ किलो ४ किलोफळधारणा ३ १२ किलो १९ किलो ५ किलो(कृषिविद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.