Sugarcane Farming: उसासाठी संतुलित अन्नद्रव्यांचा वापर
Sugarcane Nutrient Management: अतिरिक्त व असंतुलित खतांच्या वापरामुळे मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते, सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता घटते व हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढते. रासायनिक खतांचा संतुलित व शास्त्रीय वापर केल्यास कार्बन शोषणास अप्रत्यक्षपणे चालना मिळते. संतुलित पद्धतीने खतांचा वापर केल्यास जमिनीत कार्बन स्थिरीकरणाला मदत होते.