Nahsik News : शेतरस्त्यांच्या सीमांकन व मोजणीसह हद्द निश्चिती सरकारने सुरू केली आहे; परंतु आता या रस्त्यांचे तातडीने मजबुतीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील कंपन्यांचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड शेतरस्त्यांसाठी सक्तीचा करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. .स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेला शेतरस्त्यांचा प्रश्न आजही कायम आहे. रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे शेतीपूरक व्यवसाय बंद पडणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शेतीमाल बाजारात न पोहोचणे, जमिनी पडीक पडणे, अगदी फौजदारी स्वरूपाच्या घटना घडणे अशा गंभीर परिणामांना शेतकरी तोंड देत आहेत. त्यासाठी कंपन्यांचा सीएसआर फंड सक्तीने वळवावा, अशी मागणी करण्यात आली आहे..Farm Road Issue : साताऱ्यातील ३८६ पाणंद रस्त्यांची होणार दुरुस्ती .तर ‘समृद्ध शेतकरी समृद्ध महाराष्ट्र’ हे स्वप्न पूर्ण होईलभारत कृषीप्रधान देश आहे. देशात औद्योगिकीकरणासाठी शेतकऱ्यांनी जमीन दिली आणि राज्यात कंपन्यांचा विकास झाला. पण शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शेतरस्ते तितकेच आवश्यक आहेत. .Farm Road : धाराशिवमध्ये ७२ किलोमीटरच्या ३७ रस्त्यांच्या सीमांकनाला वेग.अतिवृष्टीमुळे कच्चे रस्ते वाहून जातात आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. जर कंपन्यांचा सीएसआर निधी शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी वापरला, तर ग्रामविकासाला मोठी चालना मिळेल. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.