US Airstrikes on Iran after Hormuz Attack: होर्मूझ सामुद्रधुनीत एका कंटेनरवाहू जहाजावर झालेल्या इराणी हल्ल्यानंतर अमेरिकेने रविवारी (ता. १२) पहाटे इराणवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहारीन, कुवेत, कतार, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमानवर क्षेपणास्त्रे व ड्रोन डागले. या घडामोडींमुळे पुन्हा एकदा पश्चिम आशियात तणाव उसळला असून, होर्मूझ सामुद्रधुनी संघर्षाची केंद्रबिंदू बनली आहे..अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील सुमारे १४० लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले. यामध्ये क्षेपणास्त्र व ड्रोन प्रक्षेपण केंद्रे, दारूगोळा साठे, दळणवळण यंत्रणा आणि इतर लष्करी सुविधा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याची इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचा अमेरिकेचा दावा आहे..US-Iran Nuclear Talks: अमेरिका-इराण वाटाघाटींना धक्का.या हल्ल्यांच्या अनुषंगाने अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी, ‘‘इराणने चुकीचा निर्णय घेतला आणि आता त्याची किंमत मोजावी लागेल,’’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यावर इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी, ‘‘एकतर्फी करारांचा काळ संपला आहे. दिलेला शब्द पाळा, अन्यथा परिणामांना सामोरे जा,’’ असे प्रत्युत्तर दिले..आखाती देशांत ‘हाय अलर्ट’!इराणच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईनंतर बहारीन, कतार, कुवेत आणि इतर आखाती देशांमध्ये संभाव्य हवाई हल्ल्यांचे इशारे देण्यात आले आहेत. आपल्या रोखाने येणारी इराणी क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा कतारने केला. परंतु या हल्ल्यात एका बालकासह तीन जण जखमी झाल्याचे कतारच्या गृह मंत्रालयाने सांगितले. बहारीनमध्ये तिसऱ्यांदा हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला असून, कुवेतनेही इराणी क्षेपणास्त्रे रोखल्याचे म्हटले आहे. ओमानच्या ईशान्य भागात ड्रोन हल्ले झाल्याचे सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले. संयुक्त अरब अमिरातीतील काही ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त असले, तरी याबाबतचा अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही..Hormuz Strait Crisis: ‘हालचाली थांबवा, अन्यथा कारवाई’; इराणी नौदलाचा व्यापारी जहाजांना इशारा.कंटेनरवाहू जहाजाला आगसायप्रसच्या ध्वजाखाली नोंदणीकृत एका कंटेनरवाहू जहाजावर होर्मुझ सामुद्रधुनीत इराणने हल्ला केला. या हल्ल्यात जहाजाच्या इंजिनाचे मोठे नुकसान झाले असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. ब्रिटनच्या ‘युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स’ (यूकेएमटीओ) संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जहाज ओमानच्या किनाऱ्यालगतच्या मार्गाने प्रवास करत होते. आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी जहाज सोडले. इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने मात्र काही जहाजांनी त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यापैकी एका जहाजावर ‘इशारावजा कारवाई’ केल्याचा दावा केला आहे..बदला घेतलाच जाईल!दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोज्तबा खामेनेई यांनी वडील अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेतलाच जाईल, असे पहिल्यांदाच प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.होर्मूझ बंद ठेवण्याचा इराणकडून इशाराइराणने होर्मूझ सामुद्रधुनी ‘‘पुढील आदेशापर्यंत बंद राहील’’ असे जाहीर केले असून, आणखी हल्ले झाल्यास प्रदेशातील आणखी शत्रू तळांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.