Global Impact of US Iran War: शांतता चर्चेसाठी इराणवरील दबाव वाढविण्यासाठी अमेरिकेने इराणची नाकेबंदी करण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न आणखी तीव्र केले आहेत. इराणशी संबंध असलेले किंवा इराणला मदत पुरवठा करत असल्याचा संशय असलेले कोणतेही जहाज अडवून त्याची तपासणी करण्याचा निर्णय अमेरिकेच्या नौदलाने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले..अमेरिकेने होर्मूझच्या बाहेर त्यांच्या अनेक युद्धनौका व दहा हजारांहून अधिक सैन्य तैनात केल्या आहेत. इराणची नाकाबंदी सुरू होण्याच्या आधीच होर्मुझमधून बाहेर पडलेल्या जहाजांचाही माग काढून तपासणी केली जाणार आहे. अमेरिकी नौदलाने अनेक वस्तूंची यादीही तयार केली असून या वस्तूंची इराणसाठी वाहतूक केली जात असेल तर या वस्तू जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे..US Iran Conflict: इराण युद्धाचा शेवट जवळ आला आहे : डोनाल्ड ट्रम्प.या यादीमध्ये शस्त्रे, दारूगोळा, लष्करी उपकरणे याबरोबरच तेल, लोह, पोलाद, ॲल्युमिनियम आणि इतर काही वस्तूंचा समावेश आहे. यावरून, इराणचा सागरी व्यापार पूर्णपणे ठप्प करण्याचा अमेरिकेचा इरादा असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेने इराणच्या हद्दीतील समुद्रात नाकाबंदी सुरू केली असून या हद्दीत येणाऱ्या जहाजाला पूर्व इशारा दिला जात आहे. जहाजांवरील खलाशांनी तपासणीसाठी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अमेरिकेने केले आहे..US Iran Conflict: दोन आठवड्यांची शस्त्रसंधी.युरोपीय देशांची बैठकहोर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या पुढाकाराने पॅरिस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत पंधरा देश सहभागी होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेला या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही. अमेरिकेने युद्धात सहभागी होण्याचे आवाहन केलेले, मात्र सहभागास नकार दिलेल्या देशांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. पश्चिम आशियातील युद्धात अमेरिकेला मदत न करण्याचे धोरण स्वीकारल्याने युरोप आणि अमेरिका यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे..पुढील चर्चेसाठी तयारीअमेरिका आणि इराणमधील वाटाघाटीच्या दुसऱ्या फेरीसाठी पाकिस्तानमध्ये तयारी सुरू झाली आहे. चर्चेची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी या आठवड्यात ही चर्चा अपेक्षित आहे. मागील आठवड्यात इस्लामाबादमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरली होती. या चर्चेच्या तयारीसाठीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर सध्या इराण दौऱ्यावर आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.