US India Agricultural Trade : अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी भारताच्या व्यापार धोरणावर जोरदार टीका केली आहे. जर भारताने अमेरिकेत पिकवलेला मका खरेदी केला नाही, तर ते अमेरिकेची बाजारपेठ गमावून बसतील, असा इशारा लुटनिक यांनी दिला आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार चर्चा पुन्हा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली..रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याची सूचना यापुर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला केली होती. तसेच भारत माफी मागेल आणि ट्रम्प यांच्याशी एक किंवा दोन महिन्यांत करार करेल असा दावा केला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. पण असे असुनही लुटनिक यांनी भारतावर दबावतंत्राचा अवलंब केला आहे..“भारताला १४० कोटी लोकसंख्येचा अभिमान आहे...पण ते आमच्याकडून एक पोतही मका खरेदी का करत नाही? ही गोष्ट तुम्हाला खटकत नाही का? राष्ट्राध्यक्ष म्हणत आहेत की आयात शुल्क कमी करावे लागेल...आपल्याला अनेक वर्षाची चूक आता सुधारावी लागेल. तुम्ही हे मान्य करा नाही तर तुम्हाला जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या देशासोबत व्यापार करणे कठीण होईल," असा इशारा लुटनिक यांनी दिला. त्यांच्या वक्तव्यातून केवळ नाराजीच नव्हे, तर धोरणात्मक हतबलताही स्पष्टपणे दिसून येते..Agriculture Scientists: शास्त्रज्ञ पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर.चीनची अमेरिकेला बगल, ब्राझीलकडून मका, सोयाबीन खरेदीकृषी व्यापारसंबंधित मतभेद हे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वादाच्या केंद्रस्थानी आहेत. चीनने अमेरिकेला बगल देत ब्राझीलकडून मका आणि सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. यामुळे अमेरिकेचा कृषी व्यापार मोठ्या संकटात सापडला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका त्यांची कृषी उत्पादने खरेदीसाठी सातत्याने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे..ट्रम्प यांच्या आयात शुल्क धोरणामुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या धोरणांवर शेतीमाल उत्पादनात आघाडीवर असलेल्या राज्यांतील नेत्यांनी टिका केली आहे. चक ग्रासली (आयोवा) आणि डॉन बेकन (नेब्रास्का) या रिपब्लिकन नेत्यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उत्तर कॅरोलिनाचे सिनेटर थॉम तिलिस यांनी म्हटले आहे की, त्यांच्या राज्यातील काही शेतकरी ट्रम्प यांच्या धोरणामुळे कर्जबाजारीच्या उंबरठ्यावर आहेत..Agriculture : अमेरिकेचे फूड बास्केट असलेल्या ‘या’ राज्यासोबत महाराष्ट्राचा करार, कृषीसह विविध क्षेत्रात एकत्र काम करणार .भारत अमेरिकेतून मका का खरेदी करत नाही?भारतीय प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, भारत अमेरिकेतील मका न घेण्यामागे तीन मुख्य कारणे आहेत. जी अमेरिकेला चांगलीच माहित आहेत. अशा वक्तव्यांमुळे वाटाघाटी पुढे नेण्यासाठी मदत होणार नाही. ते सांगतात की, भारत हा जगातील पाचवा सर्वात मोठा मका उत्पादक देश आहे आणि तो यात स्वयंपूर्ण आहे. काही वर्षांपासून मका निर्यातदेखील केला जात आहे. अमेरिकन मका हा बहुतांश जनुकीयदृष्ट्या सुधारित म्हणझेच जीएम आहे. भारत कापूस वगळता जीएम उत्पादने आयात करत नाही. तसेच जे देश त्यांच्या कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर अनुदान देतात, अशा देशांतून होणाऱ्या आयातीपासून स्वतःच्या कृषी क्षेत्राचे संरक्षण करणे हा भारताचा अधिकार आहे. कारण भारतातील कृषी क्षेत्र सुमारे ५० कोटी लोकांना रोजगार देते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.