Parbhani News: सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या परभणी येथील सय्यद शाह तुराबूल हक यांचा उरुस सुरू झाला आहे. उरुस निमित्त रविवारी (ता. १) दुपारी संदल शरीफची सुरुवात रेल्वे स्टेशन येथील मस्जिद उस्मानशाही येथून जिल्हाधिकारी तथा उरुस अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. .यावेळी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी,निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार संदीप राजापूरे, वक्फ मंडळाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख, उरुस व्यवस्थापक व विशेष अधीक्षक खुसरोखान, जिल्हा वक्फ अधिकारी इम्रान नदवी व इतर मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..Narnala Festival: नरनाळा महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या ‘जखमेवर मीठ’ .तत्पूर्वी उरुस संयोजक यांच्याकडून मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. संदल शरीफ दरवर्षी प्रमाणे परंपरागत पद्धतीने काढण्यात आला. या वेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..Agricultural Technology Festival: सगरोळीत दोनदिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सव.जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, की उरुसातून एकोप्याचे संदेश दिला जातो.उरुस हा आनंदाचा सोहळा आहे. तो शांततेत साजरा करावा. भाविकांना सुलभ पद्धतीने सोहळा साजरा करता यावा म्हणून प्रशासनाच्यावतीने योग्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. उरुसात मीना बाजार, विविध खेळणी हे महिला व बालकांना विशेष आकर्षणाचे केंद्र ठरतात. या वर्षीही मोठ्या प्रमाणात दुकाने व खेळणी लावण्यात आली आहेत. प्रशासनाच्यावतीने दोन आढावा बैठक घेण्यात आल्या. भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. सर्व भाविकांनी हा एकोप्याची सोहळा आनंदाने साजरा करावा व प्रशासनाला सहकार्य करावे..गडबड करणाऱ्यांवर होणार कडक कार्यवाई...पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, यावर्षी अधिक पोलिस बंदोबस्त लावला आहे. एक एसीएसपी यांच्या नेतृत्वात पाच पोलिस निरीक्षक,पीएसआय व सोबत दिडशे पोलिसांचा ताफा असणार आहे. सोबत व्हिजिलन्स व्हॅन,शंभर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहे. सोहळ्यात गडबड करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.