Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिनानिहाय मंजूर साठ्याच्या तुलनेत ‘रेक प्लॅन’च कमी मिळत असल्याने युरियासह विविध खतांच्या उपलब्धतेचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे मका व ऊस पिकाला युरियाचे व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना तसेच कृषीच्या यंत्रणेला खत उपलब्धतेचे नियोजन करताना कमालीची कसरत करावी लागत आहे..माहितीनुसार, यंदा खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ३ लाख ९१ हजार १८९ टन विविध प्रकारच्या खतांची मागणी करण्यात आली होती. कृषी आयुक्तालयाकडून त्यापैकी ३ लाख १ हजार ४६८ टन विविध खतांचा साठा मंजूर करण्यात आला. त्यापैकी ऑगस्टअखेर २ लाख ५४ हजार ४२७ टन खताचा साठा मंजूर होतो..Urea Shortage : युरिया खताचा पुरवठा नियमित करणार.त्यापैकी १ लाख ८२ हजार २०६ टनच खतांचा पुरवठा करण्यात आला. शिवाय १ लाख २ हजार ९७६ टन मार्च अखेरचा खतसाठा उपलब्ध होता. त्यामुळे खरीप हंगाम २०२५ साठी सुमारे २ लाख ८५ हजार १८३ टन खताची उपलब्धता झाली होती..Urea Data Mismatch: पावणेतीन लाख टन युरियाचा हिशेब लागेना.त्यापैकी सुमारे २ लाख ३० हजार ६२१ टन खताची ११ ऑगस्टअखेर विक्री झाली. त्यामुळे जिल्ह्यात विविध प्रकारची सुमारे ५४,५६५ टन खतेच उपलब्ध असल्याची स्थिती आहे. यात सर्वाधिक तुटवडा युरियाचा आहे..युरियाचा तुटवडा होऊ नये यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विक्रेत्यांनी ई-पॉस मशिनवरच खताची विक्री करावी.प्रकाश पाटील, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.