Farmers Facing Fertilizer Shortage: अकोला जिल्ह्यात युरिया व इतर खताची पुरेशी उपलब्धता नसल्याने अकोटमध्ये सोमवारी (ता. ८) पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांबाहेर गर्दी केली होती. एका युरियाच्या बॅगेसाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून प्रशासनाच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे..अकोट परिसरातील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून रासायनिक खतांसाठी कृषी केंद्रांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र जिल्ह्यात युरिया आणि इतर खतांचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अत्यल्प प्रमाणात पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना केवळ एकच बॅग देण्यात येत असल्याचे समोर आले आहे..Agriculture Fertilizers Sales: खतांची अतिखरेदी.सोमवारी पहाटे चार वाजल्यापासूनच युरियासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. गर्दी वाढत गेल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. अखेर प्रशासनाला पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिस बंदोबस्तात खतवाटप करण्यात आले तसेच संबंधित घटकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला..दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून वारंवार पुरेसा खतसाठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात खतपुरवठा होईल, असेही सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात कृषी विक्रेत्यांकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या रांगांमुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे..Fertilizer Shortage : संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खत खरेदीत मोठी वाढ.अकोट तालुक्यात केळी, संत्रा आणि कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी खतटंचाईमुळे उत्पादन घटले आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यंदाही युरिया व डीएपी खतासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे. बदलते हवामान, एल-निनोचे संकट आणि सततची नापिकी यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे, असे शेतकरी सांगत आहेत..खरीपपूर्व कामे सुरू असतानाच खतटंचाईची चिंता वाढली आहे. शासनाने ग्रामीण भागात तातडीने मुबलक खतसाठा उपलब्ध करून द्यावा. तसेच लोकप्रतिनिधींनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.गजानन धर्मे, शेतीनिष्ठ शेतकरी, अकोली जहागीर, ता. अकोट, जि.अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.