Urea Fertilizer Supply Issue: खरीप हंगाम सुरु झाल्याने शेतीकामांना वेग आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. पण शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतीच्या मशागतीच्या कामासाठी डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या दिसून आल्या. आता युरिया खतासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये युरियासाठी शेतकरी संतप्त झाल्याचे दिसून आले. येथे पहाटे ४ वाजल्यापासून शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. या रांगेत महिला शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. .येथे युरिया खरेदीवरुन शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांमध्ये वाद झाला. केवळ २०० पोती आल्याने प्रत्येक शेतकऱ्याला एकच पोते देण्याचे चालकाने ठरवल्याने शेतकरी संतप्त झाले. येथे गोंधळ वाढल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. .Urea Fertilizer Supply: अकोला जिल्ह्यात पाच दिवसांत ७,१०१ टन युरिया उपलब्ध होणार; शेतकऱ्यांना दिलासा.अधिक मिळालेल्या माहितीनुसार, कृषी सेवा केंद्र उघडण्याच्या आधीच पहाटे ४ वाजल्यापासून अनेक शेतकरी रांगेत उभे राहिल्याचे दिसून आले. खरीप हंगामासाठी खतांची गरज असल्याने शेतकऱ्यांना युरियासाठी ताटकळत राहण्याची वेळ आली. त्यात युरियाच्या टंचाईमुळे शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालक आमने- सामने आले. दुकानासमोरील रांगेत सुमारे ४०० हून अधिक शेतकरी उभे होते. पण युरिया मिळत नसल्याने दुकानासमोरच गोंधळ उडाला. .Urea Supply: चीनकडून युरिया निर्यातीला मंजुरी, भारताला दिलासा मिळेल का?.'शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही, त्यांनी काय करावे?'; शेतकऱ्याचा सवाल येथील परिस्थितीवर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ''पहाटेपासून रांगेत उभा आहे. आपला देश कृषीप्रधान आहे. पण शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही, त्यांनी काय करावे?'' असा सवाल एका शेतकऱ्याने केला. शेतकऱ्यांना खते मिळाली पाहिजेत. कुणीही शेतकरी वंचित राहू नये, आम्ही उन्हातान्हात उभे आहोत. येथे पिण्याच्या पाण्याची सोयदेखील नाही, असेही त्यांनी सांगितले..शेतकरी तासनतास रांगेत उभे असून, येथील परिस्थिती गंभीर बनली आहे. यामुळे कृषी सेवा केंद्राने खताचे वाटप करावे, अशी विनंती एका नागरिकाने केली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.