योगी सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट २०२५-२६ हंगामासाठी उसाच्या राज्य निर्धारित मूल्यात (SAP) प्रति क्विंटलमागे ३० रुपयांची वाढयोगी आदित्यनाथ यांचे सरकार सत्तेत आल्यापासूनची 'एसएपी'त केलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ.Sugarcane Price Hike: योगी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. राज्य सरकारने २०२५-२६ गाळप हंगामासाठी उसाच्या राज्य निर्धारित मुल्यात (SAP) प्रति क्विंटलमागे ३० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे, सामान्य आणि सुधारित वाणाचे निर्धारित मुल्य अनुक्रमे प्रतिक्विंटल ३९० रुपये आणि ४०० रुपये झाले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार सत्तेत आल्यापासूनची 'एसएपी'त केलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. २०१७ पासून राज्य सरकारने 'एसएपी'त एकूण ८५ रुपयांची वाढ केली आहे..या निर्णयाची घोषणा मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केली. या निर्णयाचा सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. यामुळे राज्य सरकारला साखर उत्पादन वाढीसाठी मोठा हातभार लागेल, असे चौधरी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य आहे."या वाढीमुळे शेतकऱ्यांना सुमारे ३,००० कोटी रुपये अतिरिक्त मिळतील," असे त्यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले..Sugarcane Price: उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांचा ऊस कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांना.विशेष म्हणजे, पुढील वर्षी होणाऱ्या पंचायत निवडणुकांच्याआधी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा सत्ताधारी भाजपला निवडणुकीत फायदा होऊ शकते. विशेषतः पश्चिम उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागात जिथे ऊस उत्पादक आणि कारखान्यांची संख्या अधिक आहे..Sugarcane Rate: मराठवाड्यातील कारखान्यांनी साडेतीन हजाराचा भाव द्यावा.उत्तर प्रदेश सरकारने २०२४-२५ च्या हंगामात उसाच्या 'एसएपी'मध्ये कोणतीही वाढ केली नव्हती. त्यावेळी सामान्य आणि सुधारित वाणाचे निर्धारित मुल्य प्रतिक्विंटल ३६० रुपये आणि ३७० रुपये होते..राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. राज्य सरकारने आवश्यकतेनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तरतुदीत वाढ केली आहे. तसेच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर बिले मिळावीत, यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे..''उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यक्षमतेमुळे आणि पारदर्शक व्यवस्थापनामुळे साखर उद्योगात १२ हजार कोटींची मोठी गुंतवणूक झाली आहे. चार नवीन कारखाने सुरु झाले आहेत. सहा बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. ४२ साखर कारखान्यांनी त्यांची ऊस गाळप क्षमता वाढवली आहे. दोन साखर कारखान्यांनी सीबीडी प्लांटदेखील उभे केले आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले जात आहेत. २००७ ते २०१७ पर्यंत, १,४७,३४६ कोटी रुपये दिले आहेत. तर २०१७ पासून आतापर्यंत, सुमारे २,९०,२२५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. म्हणजेच यात सुमारे १,४२,८७९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.'' असे मुख्यमंत्री कार्यालयाने नमूद केले आहे. ."उत्तर प्रदेश सरकारने उसाचा गोडवा कायम राखला असून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव दिला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार!" असे केंद्रीय मंत्री आणि आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांनी एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे..उत्तर प्रदेशात ऊस लागवडीखालील क्षेत्र २० लाख हेक्टरवरून २९.५१ लाख हेक्टरपर्यंत विस्तारले आहे. यामुळे उत्तर प्रदेश ऊस लागवडीत देशातील आघाडीचे राज्य बनले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.