ठळक मुद्देपंजाबमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासाउत्तर प्रदेश सरकार पंजाबमधील शेतकऱ्यांना १ हजार क्विंटल गहू बियाणे पुरवणार पंजाब सरकारदेखील रब्बी हंगामासाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांना २ लाख क्विंटल गहू बियाणे मोफत देणार .Punjab Farmers: पंजाबमध्ये पुराने शेतीचे मोठे नुकसान झाले. यामुळे पिकांचे नुकसान झालेले पाहून येथील शेतकरी कोलमडला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार पंजाबमधील शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहे. उत्तर प्रदेश सरकार पंजाबमधील शेतकऱ्यांसाठी १ हजार क्विंटल गहू बियाणे देणार आहे. याबाबतची माहिती पंजाबचे कृषिमंत्री गुरमीत सिंग खुडियां यांनी गुरुवारी दिली..खुडियां यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या कृषी रब्बी मोहीम-२०२५ राष्ट्रीय परिषदेदरम्यान उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही यांनी पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून १ हजार क्विंटल गहू बियाणे (३२७ वाण) देणार असल्याचे म्हटले. .Punjab Floods: बुडता पंजाब.मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकतेच, राज्य सरकारकडून येत्या रब्बी हंगामासाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांना २ लाख क्विंटल उच्च दर्जाचे गहू बियाणे मोफत देण्यात येतील, असे जाहीर केले होते. ही सुमारे ७४ कोटी रुपये किमतीची बियाणे असतील. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या सुमारे पाच लाख एकर शेती जमिनीवरील पेरणीसाठी ही मोफत बियाणे दिली जातील. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. भात, कापूस आणि मक्याचे उभे पीक उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे असंख्य शेतकरी संकटात असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. .Wheat Export : गहू आणि त्यापासून तयार उत्पादनांच्या निर्यातीला परवानगी का नाही?; केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं.पूरग्रस्त शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या गहू बियाणांचे मोफत वाटप करण्याची जबाबदारी पंजाब राज्य बियाणे महामंडळाची असेल, असे पंजाबचे कृषिमंत्री म्हणाले. मोफत गहू बियाणे वाटपाबाबत लवकरच शेतकऱ्यांना कळवले जाईल. शेतकऱ्यांना पंजाब कृषी विद्यापीठाकडून शिफारस करण्यात आलेले गहू बियाणे वितरित केली जाणार आहे..पूरग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत गव्हाच्या बियाण्यांव्यतिरिक्त, पंजाब सरकार राज्यातील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर ६०,८७१ क्विंटल दर्जेदार गव्हाचे बियाणेदेखील देणार आहे. याची किंमत प्रति क्विंटल २ हजार रुपये असेल. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करणे, दर्जेदार बियाणे अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध देण्याचा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.