Mumbai News: वसईची ओळख असलेली सुकेळी अवकाळी पाऊस, बदलते हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे एक महिना उशिराने आता बाजारात दाखल होऊ लागली आहेत. त्यातच वसईत राजेळी केळीचे उत्पादन घटले आहे. परिणामी सुकेळीच्या उत्पादनावरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे सुकेळींचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी वसईतील उत्पादकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बाजारात आलेल्या सुकेळीला आता किलोला ६०० रुपयांचा भाव मिळत आहे..पारंपरिक पद्धतीने पिकवावी लागणारी, आंबट-गोड चवीची, पिवळ्या रंगाची सुकेळी ही वसईची खास ओळख आहे. यामध्ये जीवनसत्वांचे प्रमाणही चांगले असल्याचे अजूनही अनेक ठिकाणी सुकेळीलाचांगली मागणी आहे. असे असले तरी सध्या वसईतील राजेळी केळी जवळपास हद्दपार झाली आहेत. त्यातच सातत्याने हवामानात होणारे बदल आणि जमिनीचा घसरता दर्जा यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. वसईत मोजकेच शेतकरी सुकेळी पिकविण्याचा व्यवसाय करीत आहेत..Heavy Rainfall Loss: अतिवृष्टीचा साडेसात हजार हेक्टरला फटका.गेल्या काही वर्षांत राजेळी केळींच्या उत्पादनात घट झाल्यामुळे केरळमधून केळी मागवून त्यांच्यापासून सुकेळी तयार केली जात असल्याचे व्यावसायिक व शेतकरी मिलिंद म्हात्रे यांनी सांगितले. सुकेळी तयार करण्यासाठी साधारणपणे २२ दिवसांचा कालावधी लागतो. यात सात ते आठ दिवसांचा कालावधी केळी पिकवायला, तर पुढील १० ते १५ दिवसांचा कालावधी केळी सुकवायला लागतो..Maize Procurement: मका खरेदी केंद्राअभावी कर्नाटकातील शेतकऱ्यांना फटका, व्यापाऱ्यांकडून भाव पाडून खरेदी, क्विंटलमागे ८०० रुपयांचे नुकसान.प्रति किलो हजाराचा भाववसईच्या राजेळी केळीपासून बनवलेली सुकेळीचा आजही बाजारात भाव कायम आहे. या सुकेळींची विक्री एक हजार रुपये प्रतिकिलो भावाने, तर केरळ येथील केळींपासून तयार करण्यात आलेल्या सुकेळींची विक्री सहाशे ते आठशे रुपये प्रतिकिलो भावाने केली जाते. वसईच्या सुकेळीला देश, परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी असते..अवकाळी पाऊस, त्यातच हवामानात झालेला बदल आणि वसईमध्ये राजेळी केळींचे घटलेले उत्पादन, तसेच सरकारकडून मिळणारी अत्यल्प मदत यामुळे गेल्या काही वर्षांत सुकेळींचे उत्पादन घटले आहे, पण तरीही वसईतील काही निवडक उत्पादक सुकेळीचे उत्पादन टिकविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.- मिलिंद म्हात्रे, आगाशी, सुकेळी उत्पादक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.