Indapur News: इंदापूर तालुक्यात मे २०२५ मध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील सुमारे आठ हजार ५०० शेतकऱ्यांच्या २४७१.७६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे व जमिनीचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून सुमारे पाच कोटी ५७ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे. मात्र, वेळेत भरपाई न मिळाल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचा फार्स कशासाठी, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत..अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे होणारे नुकसान शेतकऱ्यांचे वर्षाचे अर्थकारण पाण्यात घालवणारे असते. नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून केवळ त्याचे पंचनामे करण्याइतपत शासकीय यंत्रणा राबते. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे यंत्रणा करीत आहे..Farmer Compensation Delay : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा प्रस्ताव रखडला.ही बाब म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. कृषी विभाग व तहसील कार्यालयाच्या माध्यमातून नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केले. मग आता चार महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी शेतकऱ्यांना एक दमडीही मिळाली नसल्याची वस्तुस्थिती आहे. यातच आता अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीपातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे..शेतकऱ्यांप्रती सरकार असंवेदनशीलखते, औषधे, पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या तुलनेत शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. रक्ताचं पाणी करून पिकविलेल्या मालाचे चार पैसे मिळतील या आशेने पिकांची लेकरासारखी निगा राखतो. मात्र निसर्गाच्या वक्रदृष्टीपुढे त्याला नमते घ्यावे लागते. अशा वेळी मायबाप सरकारने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची त्याची अपेक्षा असते..Farmer Compensation: पंचनाम्यातून नुकसानग्रस्त वंचित राहू नयेत .मात्र सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील आहे. दिवाळीच्या तोंडावर खरिपातील पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांची दिवाळी कडू ठरविणारे आहे. यामुळे शासनाने पंचनामे करण्याबरोबर त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. दरम्यान, तालुक्यात कृषिमंत्रिपद असल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असे विजय गावडे यांनी सांगितले..इंदापुरात चार हजारांहून अधिक घरांचे नुकसानमे २०२५ महिन्यामध्ये अवकाळीने इंदापूर तालुक्यातील तीन हजार ६३९ घरांचे प्रापंचिक नुकसान झाले. यापैकी प्रति लाभार्थी १० हजारांची मदत दोन हजार ९६४ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची कागदपत्रांची पूर्तता व त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे..तर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आजपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सुमारे ४२५ घरे पावसाच्या पाण्याने बाधित झाली आहेत. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे काम अद्यापही सुरू असून, सर्वाधिक सणसर गावातील घरांचे नुकसान झाले असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.