Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यात खरीप हंगामात मे ते ऑक्टोबर या सहा महिन्यांत झालेल्या सततच्या अवकाळी पावसाने तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. मका, कापूस, तूर यांसह अनेक खरीप पिके अतिवृष्टीमुळे हातची गेली. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त यंदा रब्बी हंगामावर आहे. .याच पार्श्वभूमीवर डिसेंबरअखेर तालुक्यात रब्बीची ११६ टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.तालुक्यात रब्बीसाठी अपेक्षित ४६ हजार ५२० हेक्टर क्षेत्र होते. प्रत्यक्षात आज रोजी ५३ हजार २०५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा रब्बी हंगामात कांदा, ऊस, मका, गहू आणि हरभरा या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसतो..Rabi Season: सुगीचे दिवस येणार कुठे लवकर, कुठे उशिरा.मात्र, रब्बी ज्वारीचे क्षेत्र प्रथमच लक्षणीयरीत्या घटले आहे. पेरणीच्या काळात, विशेषतः सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळू ज्वारीचा पेरा कमी झाला. अपेक्षित दोन हजार ७०८ हेक्टरपैकी केवळ ८१२.४० हेक्टरवर म्हणजे सुमारे ३० टक्केच पेरणी झाली आहे. त्याचबरोबर तेलवर्गीय पिकांकडेदेखील शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र सूर्यफुलाच्या पेऱ्यावरून दिसते. आतापर्यंत केवळ २५ हेक्टरवर पेरा झाला आहे..Rabi Season: मुबलक जलसाठ्यामुळे रब्बी हंगाम जोमात.विहीर, नदी नाले अजूनही ओसंडून वाहत असल्याने ऊस आणि कांदा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा एक हजार २५७ हेक्टरवर पूर्वहंगामी ऊस लागवड झाली आहे. एकूण एक हजार ८५७ हेक्टर उसापैकी सुमारे ४०० हेक्टरवरील ऊस तोडणीस आलेला आहे, तर कांद्याची तीन हजार ५५८ हेक्टरवर लागवड झाली आहे..बहुतांश शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यांत फरदड कापूस न घेता कांदा, कांदा बीजोत्पादन व ऊस उन्हाळी बाजरीची लाववड करतात. त्यामुळे अजून रब्बीच्या पेऱ्यात वाढ होऊ शकते.- संदीप शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, कन्नड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.