राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाचा तडाखा कायम लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोरोळ मंडळात सर्वाधिक १६३ मिलिमीटर पाऊसबीड, लातूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक.Unseasonal Rain: राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा कायम आहे. गेल्या २४ तासांत विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी या पाच जिल्ह्यातील ४० मंडळांत अतिवृष्टीची झाली आहे. लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोरोळ मंडळात सर्वाधिक १६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..पुढील दोन दिवसात धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघरमध्ये गुरुवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे..Rain Crop Damage: पावसाने पिकांची मोठी हानी.'या' मंडळात अतिवृष्टीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव मंडळात, जालना जिल्ह्याच्या जालना तालुक्यातील विरेगाव, परतूर तालुक्यातील परतूर मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बीड जिल्ह्याच्या अंबोजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई, लोखंडी, घाटनांदूर, बर्दापूर, केज तालुक्यातील होळ, बनसारोळा, परळी तालुक्यातील परळी, नागपूर, लातूर जिल्ह्याच्या लातूर तालुक्याच्या लातूर, बाभळगाव, कासारखेडा मंडळात, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, खंडाळी, किनगाव, अंधोरी, निलंगा तालुक्यातील निलंगा, निटूर, औराद, कासार बालकुंदा, अंबुलगा, हलगरा, भातांगळी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे..Rain Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसाने ४८ हजार हेक्टरवरील पिकांची दैना.उदगीर तालुक्याच्या मोघा, हेर, तोंडार, झरी, रेणापूर तालुक्याच्या रेणापूर, पोहरेगाव, पानगाव, कारेपूर, पळशी, देवणी तालुक्यातील देवणी, बोरोळ, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हिसमाबाद, परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी, पिंपळदरी मंडळात अतिवृष्टी झाली आहे..अवकाळीने पिकांचे नुकसानलातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले. तर रब्बी पेरणीही खोळंबली आहे. येथील नदी, नाल्यांना पूर येऊन, नदीकाठच्या शेतपिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. औराद शहाजनी, तगरखेडा परिसरातील भाजीपाला आणि फळबागांना अवकाळीचा फटका बसला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.