Heavy Rainfall in Satara: खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील डिस्कळ, शिंदेवाडी, नवलेवाडी, ललगुण आणि बुध परिसरात रविवारी (ता. ३१) सायंकाळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. काही भागांत गारपीटही झाली. या पावसामुळे येरळा नदीला पुरासदृश स्थिती निर्माण झाली. .पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी गारा आणि वादळी वाऱ्यांमुळे भाजीपाला, चारा पिके, बारमाही पिके तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. सकाळपासूनच परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता..Sindhudur Heavy Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने भातपिकाचे नुकसान.दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि सायंकाळी चार ते सात या वेळेत जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाला, तर काही भागांत गारांसह मुसळधार पाऊस कोसळला..Rain Crop Damage : बर्दापूरसह परिसरात मुसळधार पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान.या वादळी पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विशेषतः भाजीपाला पिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली..पालेभाज्यांना फटका; ऊसही आडवाया पावसामुळे टोमॅटो, वांगी, मिरची तसेच विविध पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी उसाची पिके आडवी झाली आहेत. काही भागांत फळबागांनाही फटका बसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हवामानातील गारव्याबरोबरच नुकसानीची चिंता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.