Nanded News: नांदेड जिल्ह्यात सोमवारी (ता. २३) अवकाळी पावसाने काही भागात हजेरी लावल्याने वातावरणात बदल जाणवू लागला आहे. अनेक तालुक्यांत ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे जिल्ह्याच्या काही भागात गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, आंबा या पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. .नांदेड जिल्ह्यात सोमवारी (ता. २३) दुपारनंतर वातावरणात बदल होऊन वादळी वारे वाहू लागले. या काळात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या काळात नांदेड शहर व परिसरात दुपारी हलका पाऊस पडला. भोकर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मुखेडमध्येही मध्यम सरींची सुरुवात झाली आहे. नायगाव येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर बिलोली येथे मध्यम सरी पडून गेल्या. मुदखेड तालुक्यात ढगाळ वातावरण असून वारा वाहत आहे, मात्र अद्याप पाऊस झालेला नाही. हदगाव व धर्माबाद येथेही पाऊस नसून आकाश ढगाळ आहे..Unseasonal Rain: गारपीट, वादळी पावसाचा रब्बी पिकांना तडाखा; तातडीने मदतीची मागणी.किनवट तालुक्याच्या काही भागात गारपीट झाल्याचे वृत्त आहे. लोहा तालुक्यातही वारे वाहून पावसाच्या सरी कोसळल्या. सुगाव येथे गव्हाचे पीक आडवे पडले. हिमायतनगर येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडून गेला. माहूर, देगलूर आणि कंधार येथे दुपारी हलक्या सरींची नोंद झाली. उमरी तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाला आहे..Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान.अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः हरभरा, गहू व ज्वारी पिकांच्या काढणीच्या तोंडावर पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील दोन दिवस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे..नायगाव तालुक्यात सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीच्या संकटातून सावरत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे झाले आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी- साईनाथ पाटील मोरे, छावा तालुकाध्यक्ष, नायगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.