राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा तडाखाकोल्हापूरसह कोकण पट्ट्यात भात पीक कापणी थांबलीभात पिकांत पाणी साचल्याने नुकसानीची भीतीअवकाळी पावसामुळे साखर हंगाम पंधरा दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता.Maharashtra Unseasonal Rains: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा तडाखा सुरु आहे. यामुळे खरीप पीक कापणी थांबली आहे. मुख्यतः कोल्हापूरसह कोकण पट्ट्यातील भात पीक कापणीला याचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने पीक कापणी थांबली आहे. तसेच जोरदार पावसामुळे भात पीक आडवे झाले असून नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी तुफान पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील सलग तिसऱ्या दिवशी पाऊस पडला. यामुळे भात पीक कापणीत व्यत्यय आला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू भागातही ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे..लासलगावमध्ये जोरदार पाऊसनाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव परिसरातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. येथील अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचून तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..Unseasonal Rain : दिवाळीच्या सणावर संकटाचे ढग.साखर हंगाम लांबणीवर पडणार?दरम्यान, महाराष्ट्रातील गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पण अवकाळी पावसामुळे यंदाचा साखर हंगाम पंधरा दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी दसरा आणि दिवाळीच्या मुहुर्तावर ऊस मोळी टाकून गाळप हंगामाचा शुभारंभ केला. साखर कारखाने सुरु झाले आहेत. पण पावसामुळे ऊस तोडणी थांबली आहे. .Nagpur Orange : सततचा पाऊस, किडीमुळे संत्र्यांचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान.'या' जिल्ह्यांना यलो अलर्टआज (दि. २७) उत्तर महाराष्ट्रासह पालघर, मुंबई, ठाणे आणि पूर्व विदर्भाच्या भागात ढगाळ हवामान आहे. आज मुंबई वेधशाळेने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव, लातूर. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस कोल्हापूर, सातारा, कोकणसह विदर्भात जोरदार पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.