Hailstorm Crop Damage: घाटनांद्रा, जि. छत्रपती संभाजीनगर परिसरात बुधवारी (ता. १८) सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. आकाशात काळे ढग दाटून आले आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार वादळी वाऱ्यांसह गारपीट व जोरदार पावसाला सुरुवात झाली. .सुमारे अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या या पूर्वमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे..Unseasonal Rain: पूर्वमोसमी पाऊस, गारपिटीचा तडाखा.या अवकाळी पावसामुळे काढणीसाठी आलेला गहू, हरभरा तसेच कांदा पिकांवर गारांचा व पावसाचा जोरदार मारा झाला. अनेक शेतांमध्ये पिके पूर्णपणे भिजून गेली असून, काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने उभ्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली..Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट.गहू व हरभरा सोंगून ठेवलेले पिके झाकण्यासाठी शेतकरी जीव तोडून प्रयत्न करताना दिसून आले. वादळी वाऱ्यामुळे गावरान आंब्यांच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले. कच्चे आंबे मोठ्या प्रमाणावर खाली पडले. अनेक ठिकाणी गारांचा मारा इतका तीव्र होता की रस्ते व शेतांमध्ये गारांचा खच साचलेला दिसून आला..या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी डिगांबर मोरे, खुशाल पंडित, यांचा चार एकरांवरील गहू पूर्णपणे आडवा झाला असून कष्टाने उभे केलेले पीक पूर्वमोसमी पावसाने जमीनदोस्त झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.