Pune News: राज्यात मंगळवारी (ता. १७) रात्री पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावत सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, हिंगोली आदी जिल्ह्यांना तडाखा दिला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने काढणीच्या टप्प्यावर आलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..गेल्या आठ दिवसांपासून हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी सतर्क झाले असून काढणीला आलेले पिके वेगाने काढण्यात आली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून वातावरणात काहीसा बदल झाला. त्यामुळे अचानक झालेल्या बदलामुळे सांगली व मिरज परिसरात सुमारे तासभर मोठ्या प्रमाणात गारांचा मारा झाला..Crop Damage: शिरपूर, शहादा तालुक्यांत पिकांचे नुकसान. रस्ते, अंगणे व शेतांमध्ये गारांचा सडा पडला. द्राक्ष, आंबा, केळी या फळपिकांसह गहू, हरभरा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. हरिपूर, अंकली, धामणी परिसरात वादळी वाऱ्यामुळे पिके आडवी झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात काढणीला आलेले शाळू व गहू पीक जमीनदोस्त झाले. कापून ठेवलेला गहू भिजल्याने नुकसान वाढले असून, शाळू पिकाला चाऱ्यासाठी विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. .लातूर व धाराशिव जिल्ह्यांत देवणी, उदगीर, निलंगा, लोहारा, उमरगा, तुळजापूर भागांत गारपीट झाली. गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला व फळबागांना फटका बसला. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. मोठ्या गारांमुळे अनेक पिके जमीनदोस्त झाली. हिंगोली जिल्ह्यात वसमत व कळमनुरी तालुक्यांत वादळी पावसाचा जोर अधिक होता. केळी, हळद, आंबा तसेच रब्बी पिकांचे नुकसान झाले..Unseasonal Rain Damage : गारपीट अवकाळीचा पिकांना तडाखा; विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे नुकसान; बळीराजा संकटात.आंब्याच्या फांद्या मोडून फळगळ झाली, तर काढणी केलेली पिके भिजल्याने हानी वाढली. पूर्वमोसमी पावसाच्या या तडाख्यामुळे काढणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. पुढील काही दिवसांतही अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत..सर्वाधिक फटका बसलेली पिकेगहू, ज्वारी, हरभराद्राक्ष, आंबा, केळीशाळूहळद व भाजीपाला पिके.शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यातत्काळ पंचनाम्यानंतर नुकसानभरपाई जाहीर करा.पीकविमा दावे जलद निकालीकाढा.फळबागांसाठी विशेष आर्थिक मदत द्या.चाऱ्याच्या टंचाईवर उपाययोजना करा..पाऊस, गारपिट दृष्टिक्षेपातसांगली, मिरजमध्ये तासभर गारांचा मारा.शिरोळमध्ये शाळू, गहू पिकांचे मोठे नुकसान.लातूर-धाराशीवमध्ये रब्बी पिके व फळबागांना फटका.हिंगोलीत केळी, आंबा, हळद पिकांचे नुकसान.काढणीच्या टप्प्यातील पिकांचे मोठे नुकसान..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.