Ahilyanagar News : चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांना फटका बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पाथर्डी, शेवगाव, पारनरे, कर्जतला बसला आहे. अन्य तालुक्यांतही नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत..अहिल्यानगर जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. चार दिवसांत जवळपास पन्नास मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. जोरदार, मुसळधार पावसाने नद्यांना पूर आले. शेतात पाणी साचले. नदी, ओढे व सखल भागातील जमिनी पावसाने वाहून गेल्या. .खरिपातील कापूस, बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन पिकांची प्रचंड नासाडी झाली. फळबागा वाहून गेल्या. अनेक भागांत जमिनीही खरडून गेल्या आहेत. करंजी, तिसगाव, पाथर्डी, जेऊर, कासार पिंपळगाव यासह अनेक गावांत पाणी शिरल्याने घरांचे, संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी रस्ते, पूल, पाण्याखाली गेले. अजूनही पाऊस सुरूच आहे..Rain Crop Damage: पावसाने फूलशेतीसह ऊस, भातपिकाचे प्रचंड नुकसान.प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्हाभरात सुमारे एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले दिसतेय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदींसह अधिकाऱ्यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे पुलाची, नुकसान झालेली घरे, दुकानांची, देवराई, तिसगाव येथील अतिवृष्टीमुळे शेतपिके, घरे, तसेच शेवगाव तालुक्यात अमरापूर व परिसरात नुकसानीची पाहणी केली..Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी.पावसाच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले असेल, अशा कुटुंबांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी. त्या ठिकाणी अन्न, पाणी, वीज पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध करून देण्यात यावीत. ज्या नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली असतील, अशा नागरिकांना पंतप्रधान घरकुल योजनेतून घर उभारणीसाठी मदत करावी. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांनुसार मदत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले..अनेक वर्षांनंतर असा पाऊसपाथर्डी, करंजी, शेवगाव, बोधेगाव आणि परिसरासह शेजारच्या आष्टी तालुक्यातील गावांत चार दिवसांत झालेल्या पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली. मागील अनेक वर्षांत झाला नाही एवढा पाऊस या भागामध्ये झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसामुळे नाले-ओढे वाहून जाण्याबरोबरच अनेक ठिकाणी तलावांची हानी झाली आहे. नागरिकांच्या घरांची, दुकानांची तसेच शेतपिकांची मोठी हानी झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.