Beed News : नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना आणि उन्हाळ्यात टंचाईच्या झळा सोसणाऱ्या जिल्हावासियांनी यंदा ज्या वरुणराजाला साकडे घालत पावसाची आतुरतेने वाट पाहिली. त्या पावसाने जिल्ह्याला आपत्तीच्या गर्तेत ढकलले. दोन आठवड्यात महापुराने संपूर्ण जिल्ह्यात थैमान घातले. .जिल्ह्याने प्रथमच अभूतपूर्व अतिवृष्टी आणि महापुराचा थरारक आणि जीवघेणा अनुभव घेतला. हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले, शेतं पाण्याखाली गेली, घर कोसळली, रस्ते वाहून गेले, विहिरी बुजल्या. सरकारचे काहीही निकष असले तरी सहा लाख २८ हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा आकडा आहे. तर, साडे पाच हजार हेक्टर जमीन पिकांसह उखडून गेली आहे. दीड हजारांवर विहिरी बुजल्या आहेत. याचे साधारण गणित काढले तर शेतकऱ्यांचे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे..Maharashtra Flood: डोळ्यांदेखत संसार वाहून गेला....साडेसात लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फटकाया पुरामुळे जिल्ह्यातील ७ लाख ६९ हजार ०१९ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांच्या कुटुंबांची उपजीविका पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. ज्यांच्यासमोर आठवडाभरापूर्वीपर्यंत हिरव्या पिकांमुळे आशेची हिरवळ होती, तिथे आज चिखल आणि उद्ध्वस्त शिवार आहे. या शेतकऱ्यांची ६ लाख २८ हजार ४२३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कपाशी लोळून गेली आहे तर काही ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. यासह सोयाबीन, कापूस, संकरीत ज्वारी, बाजरी, उडीद, मुग मका यासारख्या खरीप पिकांचा खराटा झाला आहे..सांडस चिंचोलीचे बेट, तर अनेक गावांत शिरले पाणीगोदावरी आणि सिंदफणा नदीच्या मध्ये सांडस चिंचोली, ढेपेगाव ही दोन गावे आहेत. जायकवाडीसह माजलगाव धरणातून एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने सांडस चिंचोलीला चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा पडून बेट निर्माण झाले तर, मोगरा, सदोळा, गव्हाणथडी आदी गावात पुराचे पाणी शिरले. .Flood Damage Survey: शेतकऱ्यांना फोटो सक्ती नाही.५९४१ हेक्टर जमीन खरडून गेलीया आपत्तीतील सर्वात भयानक वास्तव म्हणजे ५९४१ हेक्टर जमीन पिकासकट खरडून जाणं.पुराच्या पाण्याने गाळ, माती, शेतीचे पाळे सर्व वाहून नेले. शिवाय आता या जमिनीवर पुढील अनेक वर्षे कोणतेही पीक घेणे शक्य नाही.१२ शेतकऱ्यांचा; साडेपाचशे जनावरांचा गेला जीव या पावसाळ्यात पूर आणि वीज पडण्याच्या घटनांमुळे १२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले. तर, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल अशा ५३८ जनावरांचा या पावसाळ्याच्या हंगामात बळी गेला आहे..विहिरी बुजल्या, नदीकाठच्या वाहून गेल्याअतिवृष्टीमुळे सातत्याने जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे साधारण २००० हजार विहिरी पूर्णपणे बुजून गेल्या आहेत. नदीकाठच्या विहिरी तर चक्क वाहून गेल्या आहेत.गोदाकाठच्या पुनर्वसनाचा प्रश्नजिल्ह्यातील माजलगाव आणि गेवराई तालुक्यातून गोदावरी नदी वाहते. पैठणच्या जायकवाडी धरणातून दोन लाख क्युसेक्सपेक्षा अधिक विसर्ग झाल्यानंतर या दोन तालुक्यांतील गावांना पुराचा फटका बसतो. माजलगावला दोन्ही नदीकाठचे खतगव्हाण, पिंप्री (खू), मोगरा, शुक्लतीर्थ लिंबगाव, सोन्नाथाडी, गुंजथडी, सुरुमगाव, गंगामासला, आडोळा, सरवर पिंपळगाव, आबेगाव, मंजरथ, आळसेवाडी, छत्र बोरगाव, सादोळा, पुरुषोत्तमपुरी, महातपुरी, काळेगावथडी, हिवरा (बु.) कवडगावथडी, डूब्बाथडी, गव्हाणथडी ही गोदावरी काठची तर, मनुर, लुखेगाव, गोविंदपूर, ढेपेगाव, सांडस चिंचोली, नागडगाव, रोषणपुरी ही २९ गावे आहेत. तर, गेवराई तालुक्यात अगारनांदुर, कटचिंचोली, हिंगणगाव, पांगुळगाव सुरळेगाव, संगमजळगाव, पंचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळसपिपळगाव, सावळेश्वर, खामगाव, राजापूर, गंगावाडी, काठोडा, नागझरी, राहेरी, बोरगावथडी, भोगलगाव, पांढरी, मिरगाव, तपेनिमगाव, ढालेगाव, श्रीपत अंतरवाला, गोपतपिंपळगाव, रामपुरी, मनुबाई जवळा, गुळज, पाथरवाला बुद्रुक, गुंतेगाव, पाथरवाला खुर्द, बोरगाव बुद्रुक ही गावे आहेत..अंदाजे हेक्टरी ३० हजारांचा तोटापिके पूर्णपणे उद्ध्वस्त तर उरल्या सुरल्या पिकांत आजही साचून आहे. त्यामुळे कपाशीची बोंडे नासली असून सोयाबीनच्या शेंगाही सडल्या आहेत. यामुळे उरलेल्या पिकांतून हाती काहीच येण्याचा अंदाज नाही. सरधोपट हेक्टरी ३० हजार रुपयांचे नुकसान म्हणले तरी शेतकऱ्यांचे साधारण २० हजार कोटींचे नुकसान झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.