Changdevrao Holkar Legacy : आशिया खंडातील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेच्या शिल्पकारांपैकी एक, कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव भागवतराव होळकर यांच्या निधनानिमित्त लासलगाव मर्चंट्स असोसिएशन लि. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोमवारी (ता. २७) श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार आवारातील प्रशासकीय कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. .यावेळी त्यांच्या कृषी व सहकार क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेत त्यांना ‘कर्मयोगी’ ही उपाधी देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. .Farmer Producer Company: स्वप्नांची कंपनी, अपूर्ण प्रयोग.नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लासलगाव ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रीय स्तरावरील नाफेडच्या अध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रामाणिक नेतृत्व आणि अथक परिश्रमाचा आदर्श होता..Agriculture Export Growth: निर्यातवाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद .यावेळी अखिल भारतीय वाइन उत्पादक महासंघाचे अध्यक्ष जगदीश होळकर, लासलगाव मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीनकुमार जैन, विश्वस्त ओमप्रकाश राका, ॲड. रमेश शिंदे, व्यापारी वाल्मीकराव जाधव, विलास देवरे, डॉ. श्रीकांत आवारे, प्रवीण कदम, रमेश पालवे तसेच बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी श्रद्धांजली अर्पण केली..याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) नाशिक विभागीय अध्यक्ष अशोक नाना होळकर, वेफकोचे अध्यक्ष संजय होळकर, किशोर होळकर, दत्तात्रय होळकर, लासलगाव मर्चंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष ऋषभ राका, विश्वस्त पुरुषोत्तम चोथाणी, सौरभ जैन, बाजार समितीचे सहाय्यक सचिव सुशील वाढवणे, सर्व लिलाव प्रमुख काकासाहेब जगताप, कांदा लिलाव प्रमुख महेश धामणे, भाजीपाला लिलाव प्रमुख संजय होळकर, नंदकुमार गोधडे, मनोज शेजवळ, गौरव निकम, राहुल शेजवळ, गणेश आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी, मदतनीस, हमाल, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.