ठळक मुद्देजीएसटीचे नवे दर आज २२ सप्टेंबरपासून देशात लागूकृषी उपकरणे आणि खाद्य पदार्थ स्वस्तछोटे ट्रॅक्टरवर २३ हजार रुपयांपर्यंत, मोठ्या ट्रॅक्टरवर ६३ हजार रुपयांपर्यंत बचत.New GST Rates : जीएसटीचे नवे दर आज २२ सप्टेंबरपासून देशात लागू झाले. यावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मोदी सरकारने जनतेसाठी मोठी भेट दिली. आजपासून सामान्यांसाठी दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. कृषी उपकरणे आणि खाद्य पदार्थही स्वस्त झाले. हा बचत उत्सव आहे. लोकांना पैसे वाचवून ते आता इतर गोष्टींवर खर्च करता येतील," असे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे. ते सोमवारी मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलत होते.."नवरात्रीत देवी आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. पण मोदी सरकारने जनतेसाठी भेटवस्तूंचा वर्षाव केला आहे. दैनंदिन वापरातील वस्तू सामान्यांसाठी आजपासून परवडणाऱ्या दरात मिळतील. बागकामासाठीच्या छोटे ट्रॅक्टरवर २३ हजार रुपयांपर्यंत आणि मोठ्या ट्रॅक्टरवर ६३ हजार रुपयांपर्यंत बचत होईल. एकत्रित कापणी यंत्रांवर १.८७ लाख रुपयांपर्यंत बचत होईल. कृषी उत्पादने आता परवडणाऱ्या दरात मिळतील. खाद्यपदार्थही स्वस्त झाले आहेत. कपड्यांवरील खर्च कमी होईल. हा 'बचत उत्सव' आहे. लोकांच्या पैशांची बचत होईल आणि ते त्यांना इतर गोष्टींसाठी वापरता येतील.’’ असे चौहान म्हणाले. .GST Reforms : ‘जीएसटी’ सुधारणांचा जनतेला दिलासा.आमचे सर्व आमदार, खासदार आणि कार्यकर्ते नव्या जीएसटी दरांबद्दल जागृती करण्यासाठी बाजारात जातील; जेणेकरून याचा फायदा लोकांपर्यंत पोहोचेल. तसेच, पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या संदेशानुसार, आपण 'स्वदेशी' वस्तू खरेदी कराव्यात. व्यापाऱ्यांनी 'स्वदेशी' वस्तू विकाव्यात, असे आवाहन त्यांनी केले..GST Reform: जीएसटी दरातील कपात शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार; कृषिमंत्री चौहान.सरकारने विविध कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांवरील जीएसटी १२ ते १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. यामुळे किरकोळ दर ७ ते १३ टक्क्यांनी कमी झाले आहेत..केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याआधी शुक्रवारी सांगितले होते की, जीएसटी दरांतील सुसूत्रीकरणामुळे शेतकऱ्यांना मदत होईल. पीएम-कुसूम सारख्या योजनेअंतर्गत सौर पंप खरेदीवरील खर्च दरवर्षी १,७५० कोटी रुपयांनी कमी होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.