कडधान्ये लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला केंद्राची मंजुरीदेशात कडधान्ये उत्पादन वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा उद्देश कडधान्ये लागवडीखालील क्षेत्र अतिरिक्त ३५ लाख हेक्टरने वाढवण्यासाठी प्रयत्नसुमारे २ कोटी शेतकऱ्यांना होईल फायदा.Pulses Production: मोदी सरकारने दसऱ्याच्या एक दिवस आधी रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. सरकारने रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली. बुधवारी, पीएम मोदींच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२६-२७ च्या विपणन हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यासाठी मंजुरी दिली. त्याचबरोबर, सरकारने कडधान्ये लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ११ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंजुरी दिली. ही तरतूद ६ वर्षांसाठी असेल. देशात कडधान्ये लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाला कडधान्ये क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी हा निधी वापरला जाईल..देशात कडधान्ये उत्पादन वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशातील अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याचा यामागील उद्देश आहे. या मोहिमेतर्गंत सरकार ११,४४० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे सुमारे २ कोटी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, साठवणूक सुविधा आणि शेतमालाच्या खरेदीची खात्री मिळणार आहे. .Pulses Import: विक्रमी आयातीमुळे कडधान्ये दबावात.सहा वर्षांच्या आराखड्यात कडधान्ये उत्पादन वाढविण्यासाठी संशोधन, बियाणे प्रणाली, क्षेत्र वाढवणे, खरेदी आणि किंमत स्थिरतेसाठी एक व्यापक रणनीती अवलंबली जाईल. अधिक उत्पादन देणाऱ्या, कीड-प्रतिरोधक आणि हवामान-प्रतिरोधक कडधान्ये वाण विकसित करणे आणि त्याच्या विविध ठिकाणी चाचण्या घेण्यावर भर दिला जाणार आहे. प्रादेशिक अनुकूलतेची खात्री होण्यासाठी प्रमुख कडधान्ये उत्पादक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी चाचण्या घेतल्या जाणार आहेत..उच्च दर्जाची बियाणे उपलब्ध करण्यासाठी, राज्ये पाच वर्षांसाठी रोलिंग बियाणे उत्पादन योजना आखतील. ब्रीडर बियाण्यांवर आयसीएआर (ICAR) ची देखरेख राहील. तर पायाभूत आणि प्रमाणित बियाणे राज्य आणि केंद्रीय संस्थांद्वारे विकसित केली जातील. साथी (SATHI) पोर्टलद्वारे त्यांचे निरीक्षण केले जाईल. देशातील २०३०-२०३१ पर्यंत ३७० लाख हेक्टर क्षेत्र कडधान्ये पिकांखाली आणले जाणार असून त्यासाठी १२६ लाख क्विंटल प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत..World Pulses Day : जमीन अन् मानवाच्या पोषणासाठी कडधान्ये महत्त्वाची.शेतकऱ्यांना बियाणे किट मोफत मिळणार याद्वारे कडधान्ये लागवडीखालील क्षेत्र अतिरिक्त ३५ लाख हेक्टरने वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी भात पिकाच्या पडीक जमिनी आणि इतर योग्य क्षेत्रावर लागवड करण्याचे लक्ष्य ठेवण्यात येईल. शाश्वत लागवड पद्धतींना प्रोत्साहन देण्यासह शेतकऱ्यांना ८८ लाख बियाणे किट मोफत वितरीत केली जाणार आहेत..तूर, उडीद आणि मसूरची जास्तीत जास्त खरेदीबाजार आणि मूल्य साखळी मजबूतीसाठी कापणीनंतरच्या १ हजार प्रक्रिया युनिट्सच्या निर्मितीला आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे. यासाठी प्रति युनिट जास्तीत जास्त २५ लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद केली आहे. यात सहभागी शेतकऱ्यांना पुढील चार वर्षांसाठी पीएम आशा (PM-AASHA) किंमत समर्थन योजनेअंतर्गत (PSS) तूर, उडीद आणि मसूरची जास्तीत जास्त खरेदी नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) द्वारे करण्याची खात्री मिळवून देण्याची केंद्राची योजना आहे..उत्पादन ३५० लाख टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्यया योजनेतर्गंत २०३०-३१ पर्यंत कडधान्ये पिकाखालील क्षेत्र ३१० लाख हेक्टरपर्यंत वाढवणे. यातून उत्पादन ३५० लाख टनांपर्यंत नेणे आणि प्रति हेक्टर १,१३० किलो उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. कडधान्ये उत्पादनात आत्मनिर्भर बनणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा यामागील उद्देश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.