ठळक मुद्देरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी १,८६६ कोटींच्या प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजुरी याचा लाभ १०.९० लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणारही बोनसची रक्कम ७८ दिवसांच्या पगाराएवढी.Railway Employees Bonus 2025 : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी १,८६६ कोटी रुपयांच्या प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (PLB) ला मंजुरी दिली. याचा लाभ १०.९० लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होईल..याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. त्यांनी सांगितले की, १० लाख ९१ हजार १४६ कर्मचाऱ्यांसाठी तरतूद केलेली ही बोनसची रक्कम त्यांच्या ७८ दिवसांच्या पगाराएवढी आहे..Rohit Pawar : तुमच्या घरातील गादी, सोफा २० लाखांचा, अन् शेतकऱ्याला केवळ एकरी ३,४०० रुपये मदत?; रोहित पवारांचा सरकारला सवाल.दरवर्षी दुर्गा पूजा, दसऱ्याच्या सुट्टीआधी रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस मिळतो. गेल्या वर्षी, मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी २,०२९ कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला होता. ज्याचा ११ लाख ७२ हजार २४० कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता..जे यासाठी पात्र आहेत; अशा रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या पगारएवढे जास्तीत जास्त १७,९५१ रुपये मिळतील. याचा लाभ रेल्वे रुळाची देखभाल करणारे कर्मचारी, लोकोमोटिव्ह पायलट, ट्रेन मॅनेजर्स (गार्ड), स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, पॉईंटमेन, मंत्रालयीन कर्मचारी आणि इतर गट 'क' श्रेणीतील कर्मचाऱ्यांना मिळेल..CM Devendra Fadnavis Solapur Visit : नुकसान भरपाईसाठी सरकार हात आखडता घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन .रेल्वेची कामगिरी चांगली२०२४-२५ मधील रेल्वेची कामगिरी खूप चांगली राहिली. रेल्वेने १,६१४.९० दशलक्ष टन एवढी विक्रमी मालवाहतूक केली. तसेच जवळपास ७.३ अब्ज प्रवाशी वाहतूक केली," असे सरकारने म्हटले आहे..याव्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने ९४ हजार ते ९५ हजार कोटी किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. "पंतप्रधानांनी आज काही ऐतिहासिक निर्णय घेतले. रेल्वेच्या बख्तियारपूर-राजगीर-तिलैया मार्गाच्या दुपदरीकरणासही मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत, हा मार्ग एकेरी होता. आता या मार्गाच्या दुपदरीकरणामुळे त्याची क्षमता वाढण्यास मदत होईल," असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.