केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी भेटमहागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढयाचा ४९ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.DA Hike July 2025 : मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) ३ टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. .केंद्राच्या या निर्णयाचा ४९ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना फायदा होईल. हा वाढीव महागाई भत्ता १ जुलैपासून लागू असेल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले. .Railway Employees Bonus : रेल्वेच्या १०.९० लाख कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, ७८ दिवसांच्या पगाराएवढा बोनस जाहीर .केंद्र सरकारने मार्च २०२५ मध्ये डीए/डीआर २ टक्क्यांनी वाढवला होता. तो १ जानेवारीपासून लागू करण्यात आला. यामुळे महागाई भत्ता हा मूळ पगार आणि पेन्शनच्या ५५ टक्क्यांवर गेला होता. आता त्यात ३ टक्के वाढ झाल्याने तो ५८ टक्क्यांवर पोहोचला आहे..केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा औद्योगिक कर्मचाऱ्यांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) वर निश्चित केला जातो. कामगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरोकडून दर महिन्याला याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते..Crop Loss: कापणीच्या मुहूर्तावर अस्मानी संकट.किती वाढणार पगार?१ जुलैपासून लागू झालेल्या या ३ टक्के महागाई भत्ता वाढीमुळे सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) मूळ पगार १८ हजार रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारात सुमारे ५४० रुपये वाढ होईल. याचाच अर्थ, त्यांचा एकूण पगार २८,४४० रुपयांवर जाईल. तर किमान ९ हजार रुपये पेन्शन असलेल्यांना अतिरिक्त २७० रुपयांची वाढ मिळेल. याचा सरकारी तिजोरीवर १०,०८४ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनवेळा वाढ केली जाते. तर यामुळे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही महागाईपासून दिलासा मिळतो. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.