Nanded News: ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महावितरणतर्फे राबविण्यात येत असलेल्या या योजनेची नांदेड परिमंडलातही प्रभावी अंमलबजावणी सुरू असून जानेवारी २०२६ पर्यंतच्या तपशिलानुसार नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत २४ हजार २१४ सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. या वाहिनीविरहित योजनेमुळे दिवसाच्या कालावधीतही शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे..मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेआधी राज्यात महावितरणतर्फे ‘कुसुम-ब’ या नावाने वाहिनी विरहित सौर कृषिपंप यांना राबविण्यात आली. त्या जुन्या योजनेतील सौर कृषिपंप वगळून मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत नांदेड जिल्ह्यात २९६६, परभणी जिल्ह्यात १३,१७८ तर हिंगोली जिल्ह्यात ८०७० सौर कृषिपंप शेतकऱ्यांच्या शेतात बसविण्यात आले आहेत..Agriculture Solar pumps: दहा हजार कृषिपंपधारकांना मिळतेय दिवसा वीज.योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ १० टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो..Solar Agriculture Pump Scheme : सौर कृषीपंप योजनेसाठी आर्थिक मागणी झाल्यास बळी पडू नये ; महावितरणचे आवाहन.पेड पेंडिंगचा प्रश्न सुटणारया योजनेमुळे कृषिपंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सुटणार आहे. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केलेली आहे..२५ वर्षांपर्यंत वीजबिल नाहीसौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषिपंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीजपुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.