Jalgaon News: खानदेशात जूनमध्ये बरा पाऊस होता. पण जुलैमध्ये अनेक भागांत कमी पाऊस झाला. या महिन्यातही काही भागात चांगला, तर काही भागांत कमी पाऊस असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. .ऑगस्टमधील पावसाची सरासरी जळगाव जिल्ह्यात मागील सात ते आठ दिवसांतच गाठली आहे. पण जूनमध्ये पाऊसमान बरे होते. जळगावचे जूनमधील एकूण पाऊसमान १२१ मिलिमीटर एवढे आहे. जूनमध्ये जळगाव जिल्ह्यात १२३ मिलिमीटर पाऊस झाला. धुळ्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला..Khandesh Rainfall : पावसाची पाठच; ‘हतनूर’मधून विसर्ग घटला.जुलैमध्येही जळगाव व धुळे जिल्ह्यांत पाऊसमान बरे होते. पण नंदुरबारात जूनमध्ये आठ टक्के पावसाची तूट होती. तर जुलैतही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात झाला. या महिन्यात सुरुवातीचे १२ ते १४ दिवस ऊन व वारा अशी स्थिती होती. अनेक भागांत किंवा मुरमाड, हलक्या जमिनीत पिकांची वाताहत झाली. .मागील सात ते आठ दिवसांत खानदेशात पाऊस झाला. यात ऑगस्टमधील पावसाची तूट भरून निघाली आहे. पण दोन, तीन दिवसांत अधिकचा पाऊस काही दिवसांत झाला. काही भागांत अतिपावसाने हानी झाली. अशातही जळगाव जिल्ह्यात असमान पाऊस आहे. चोपडा तालुक्यातील वर्डी, मंगरूळपासून ते यावलमधील फैजपूरपर्यंत पाऊसमान कमी आहे. सातपुडालगतचा हा भाग आहे. तर धरणगाव, पारोळा, अमळनेरातील काही मंडळांत याच कालावधीत अतिवृष्टी झाली. .Khandesh Rainfall : खानदेशात आत्तापर्यंत कमी पाऊसमान.धुळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ५६२ मिलिमीटर पाऊस पडतो. जळगावात ६३२ आणि नंदुरबारात ८५४ मिलिमीटर पाऊस पडतो. एवढे पाऊसमान यंदा पूर्ण होईल की नाही, हा प्रश्न कमी व अधिकच्या पावसाने कायम आहे. यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी, डोणगाव आदी पट्ट्यात अत्यल्प पाऊस मागील आठ दिवसांत झाला आहे. अशीच स्थिती जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही आहे. यामुळे कमी पावसाचे संकट अजूनही कायम आहे. .मध्यम ते हलका पाऊसखानदेशात पोळा सणाला किंवा शुक्रवारी (ता.२२) सकाळपासून अनेक भागांत मध्यम ते हलका पाऊस झाला. मध्येच पाऊस थांबत होता. दुपारी पाऊस नव्हता. सायंकाळी पुन्हा काही भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. .पुढील अति पावसात नुकसान शक्यपाऊसमान अनेक भागांत कमी आहे. पण पुढे अति पाऊस किंवा सतत पाऊस झाल्यास उडीद व पूर्वहंगामी कापूस पीक हातचे जाईल, अशी स्थिती आहे. पण दुसरीकडे पाऊसही हवा आहे. कारण पुढे पाऊस न आल्यास केळी, पपई लागवडीवर परिणाम होईल. तसेच कोरडवाहू रब्बी हंगामही हवा तसा राहणार नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.