Solapur News : कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माळशिरस तालुक्यातील पाटील वस्ती, बागेचीवाडी (अकलूज रोड) येथील ‘मे. हरी ओम कृषी सेवा केंद्र’ येथे छापा टाकून ९३,५२८ रुपये किमतीचा विनापरवाना रासायनिक खतांचा साठा जप्त केला आहे. तसेच दोघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे..जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकाचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे आणि सदस्य, गुणनियंत्रण निरीक्षक बाळू बागल, गुणनियंत्रण निरीक्षक शरद गावडे, गुणनियंत्रण निरीक्षक लक्ष्मण लामकाने, गुणनियंत्रण निरीक्षक शरद सावंत यांच्या पथकाने संयुक्तरीत्या ही तपासणी केली..छाप्यादरम्यान जालिंदर बाबूराव कदम यांच्या विक्री केंद्रात न्यूट्रीस्टार क्रॉप सायन्सेस, मांजरी बुद्रुक, पुणे या कंपनीच्या नावाने विनापरवाना उत्पादित व साठवलेली सूक्ष्म अन्नद्रव्यांची (Chelated Micronutrients) खते आढळून आली. या खतांमध्ये फेरोस्टार, झिंकस्टार, कॅल्सस्टार या खतांचा समावेश होता. .Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती.या तपासणीत गंभीर अनियमितता आढळून आली. विशेषतः संबंधित कंपनीबाबत अधिक चौकशी करता या उत्पादनास कोणताही परवाना उपलब्ध नसल्याचे, तसेच ज्या ठिकाणी कंपनीने हे उत्पादन तयार केले आहे, त्या ठिकाणाचा कंपनीचा पत्ताही बोगस असल्याची गंभीर बाब समोर आली. तसेच ज्या ठिकाणी छापा टाकला त्या विक्री केंद्रावर त्याचा साठा व विक्री नोंदी केलेल्या नव्हत्या. .Fertilizer Shortage : खतटंचाईने धान उत्पादक जेरीस .शिवाय कोणत्याही प्रकारे बिलिंग बुक किंवा ग्राहकांला दिलेले त्याचे बिल, हेही आढळले नाही. ही संपूर्ण बाब खते नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत येते. त्यामुळे संबंधित विक्रेते जालिंदर कदम (रा. बागेचीवाडी, ता. माळशिरस) आणि कंपनीचे विक्री प्रतिनिधी नंदकिशोर सोनटक्के (कोंडबावी, ता. माळशिरस) यांच्याविरोधात अकलूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई पोलिस करत आहेत..कृषी विभागाची शेतकऱ्यांना सूचनाशेतकऱ्यांनी कोणतीही खते, कीडनाशके अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करून खरेदीचे बिल अवश्य घ्यावे. अनधिकृत खत विक्रेत्यांपासून सावध राहावे, अन्यथा त्याचा थेट शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे कृषी विभागाने सांगितले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.